India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 15, 2020

Sushant singh Rajput Sister in law breathes last after mental shock of his suicide | इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात

Sushant Singh Rajput | इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात

एकीकडे सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तर त्याच वेळी म्हणजे संध्याकाळी पाच वाजता सुधादेवी यांनीही देहत्याग केल्याचे वृत्त आहे. (Sushant singh Rajput Sister in law)
Sushant Singh Rajput | इकडे सुशांतवर अंत्यसंस्कार, तिकडे वहिनीनेही प्राण सोडले, राजपूत कुटुंबावर पुन्हा आघात एकीकडे सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तर त्याच वेळी म्हणजे संध्याकाळी पाच वाजता सुधादेवी यांनीही देहत्याग केल्याचे वृत्त आहे. (Sushant singh Rajput Sister in law) INDIA 24 HOURS NEWS
Sushant singh Rajput Sister in law
पाटणा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आणखी एक आघात झाला आहे. सुशांतच्या चुलत वहिनी सुधादेवी यांचेही निधन झाले. सुशांतच्या निधनाचा मोठा धक्का बसल्याने सुधादेवी यांचे देहावसान झाल्याचे बोलले जाते. (Sushant singh Rajput Sister in law breathes last after mental shock of his suicide)
सुधादेवी या सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्रसिंह याच्या पत्नी. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र सुशांतच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून सुधादेवी यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांची शुद्ध सारखी हरपत होती. अशातच त्यांनी अन्न-पाणी सोडले. एकीकडे सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले, तर त्याच वेळी म्हणजे संध्याकाळी पाच वाजता सुधादेवी यांनीही देहत्याग केल्याचे वृत्त आहे.
सुधादेवी आणि त्यांचे कुटुंब सुशांतचे वडिलोपार्जित गाव पूर्णियातील मालदीहा येथे राहते. सुशांतपाठोपाठ आणखी एका सदस्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावात अक्षरशः स्मशानशांतता पसरली आहे.
सुशांतच्या पार्थिवावर काल (15 जून) मुंबईतील विले पार्लेत पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी त्याची बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.
सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव पुन्हा एकदा पाटण्याला नेण्याबाबत कुटुंबाने मागितलेली परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे सुशांतचे वडील लेकाला अखेरचा निरोप देण्यासाठी बिहारहून मुंबईत दाखल झाले.

धक्कादायक एक्झिट

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीयच नाही, तर बॉलिवूड, क्रीडा विश्व आणि त्याचे चाहतेही शोकसागरात बुडाले आहेत. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत.
सुशांतने रविवार 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणीत त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष नसल्याचे स्पष्ट झाले.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.
पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.
2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.
एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.
(Sushant singh Rajput Sister in law)



No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages