Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात
धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट' ज्याने शिकवला, तो संतोष लाल सात वर्षांपूर्वी जग सोडून गेला, आता हाच 'हेलिकॉप्टर शॉट' ज्याला शिकवला, त्या सुशांतनेही आयुष्य संपवलं, हा विचित्र योगायोग आहे (MS Dhoni Looses Another Friend Sushant Singh Rajput after Santosh Lal)
MS Dhoni Looses Another Friend Sushant Singh Rajput after Santosh Lal |
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने फक्त त्याचे कुटुंबीय आणि चाहतेच नाही, तर अवघं बॉलिवूड आणि क्रीडा विश्वही शोकसागरात बुडालं आहे. मोठ्या पडद्यावर धोनीची व्यक्तिरेखा साकारल्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीसोबत सुशांतचे खास मैत्र जुळले होते. तडकाफडकी आणखी एक जवळचा मित्र गमावल्याने धोनीही धक्क्यात असल्याचं बोललं जातं. (MS Dhoni Looses Another Friend Sushant Singh Rajput after Santosh Lal)
सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त आल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांपासून क्रिकेटपटू, राजकीय नेते आणि चाहते अशा सर्वांनीच त्याच्या आठवणी जागवल्या. मात्र बायोपिकच्या निमित्ताने सुशांतच्या सर्वात जवळ आलेल्या धोनीचं मौन सर्वांना सलतंय. सोशल मीडियापासून दूर असलेला धोनी कुठेतरी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देईल, अशी सर्वांना आशा आहे.
धोनीची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र धोनी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियापासून दूर असल्याचं दिसतंय. धोनीने शेवटचं ट्विट 14 फेब्रुवारीला केलं होतं, त्यानंतर त्यांने कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर केलेली नाही.
सुशांतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या केल्याने सर्वजण हादरुन गेले आहेत. नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुशांतच्या निधनानंतर धोनीच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या (धोनी) भावना पोहोचवल्याचं वृत्त ‘जागरण’ वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिले आहे. सुशांतच्या अनपेक्षित एक्झिटने माही दु:खी झाला आहे. मात्र धोनी फारसा आपल्या भावनांचे प्रदर्शन करत नाही. त्यामुळे वरकरणी त्याने धक्का बसल्याचं दाखवलं नाही, तरी त्यालाही मानसिक त्रास होत असल्याचं त्याचे मित्र सांगतात.
धोनीची ओळख असलेला आयकॉनिक ‘हेलिकॉप्टर शॉट’ ज्याने शिकवला, तो संतोष लाल सात वर्षांपूर्वी जग सोडून गेला, त्यावेळीही धोनी आतल्या आत कुढत राहिला. आता हाच ‘हेलिकॉप्टर शॉट’ ज्याला शिकवला, त्या सुशांतनेही आयुष्य संपवलं, हा विचित्र योगायोग आहे
कोण होता संतोष लाल?
संतोष लाल हा भारतीय क्रिकेटपटू होता. त्यांनी 2004 ते 2008 दरम्यान झारखंडसाठी आठ प्रथम श्रेणी सामने खेळले. तो धोनीचा बालमित्र होता. 2013 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी संतोषचा स्वादुपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला
धोनी सिनेमाची 200 कोटीची कमाई
धोनी जसा मैदानावर गाजला, तसा तो रुपेरी पडद्यावरही गाजला. सुशांत सिंह राजपूत पडद्यावर धोनीसारखा वावरला. त्यामुळेच हा सिनेमा चाहत्यांनीही डोक्यावर घेतला. या सिनेमाने 200 कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली.
MS Dhoni Looses Another Friend Sushant Singh Rajput after Santosh Lal | Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात
(MS Dhoni Looses Another Friend Sushant Singh Rajput after Santosh Lal)
No comments:
Post a Comment