India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 26, 2020

करोना: भारतातील मृत्यूदर जगात सर्वात कमी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय/world news

करोना: भारतातील मृत्यूदर जगात सर्वात कमी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

करोना: भारतातील मृत्यूदर जगात सर्वात कमी- केंद्रीय आरोग्य मंत्रालय


भारतातील करोनामुळे मृत्यू पावण्याचा दर हा जगातील देशांच्या तुलनेत सर्वात कमी असून हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले आहे.


नवी दिल्ली: लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांवरील योग्य उपचार या मुळे एकूण लोकसंख्येच्या दर १ लाखामागे ०,३ टक्के इतकाच मृत्यूदर राखण्यात भारताला यश आले आहे. मात्र, दुसरीकडे जगातील देशांचा सरासरी मृत्यूदर हा ४.४ टक्के इतका आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.जगातील काही देशांमध्ये दर एक लाख लोकसंख्येमागे ८१.२ इतक्या मृत्यूंची नोंद झाल्याचेही ते म्हणाले. हे आपल्याला लॉकडाउन, चाचण्या आणि रुग्णांना वेळेवर देण्यात आलेल्या उपचारांमुळे साध्य झाल्याचे अग्रवाल म्हणाले. लॉकडाउन, कंटेनमेंट आणि नियमांमुळे आपल्याला करोनाच्या संसर्गाची साखली तोडता आली असेही ते पुढे म्हणाले. करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचेही दिसत नसल्याचे ते म्हणाले

या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. या आजारावरील लस येईपर्यंत आपल्याला सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. सोशल डिस्टन्सिगनेच आपल्यासाठी लसीचे काम केले आहे. लोकांच्या पाठिंब्यांमुळेच आपल्याला करोनाच्या लढाईत यश मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असल्याचेही अग्रवाल म्हणाले.

भारतातील करोना संसर्गाची स्थिती सुधारच असून जगाच्या तुलनेत मृत्यूचा दरही कमी असल्याचे अग्रवाल यांनी यापूर्वीही सांगितले होते. आतापर्यंत देशातील एकूण रुग्णांपैकी ६० हजार ४९० रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. तसेच रग्ण बरे होण्याच्या दरातही सुधारणा झाली असून सध्या हा दर ४१.६१ इतका आहे. देशातील मृत्यूदर जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे आणि सध्या तो २.८७ टक्के इतका असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages