देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी
देशातील करोनाबाधितांची संख्या वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये दिवसभरातील सर्वात मोठी वाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासात
कोरोनाचे ९,८८७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत एकूण२८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची ही सं
ख्या आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे दर्शवत आहे
संसर्गाचा विचार करता भारत जगभरात सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. कोविड -१९ ची लागण झालेल्या रूग्णांची संख्या इटलीच्या तुलनेत जास्त आहे. काही दिवसांपूर्वीच बाधितांच्या संख्येच्या दृष्टीने भारताने चीनलाही मागे सारले होते. अमेरिकेत जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
दिल्लीत कोविड -१९च्या रुग्णांची संख्या २६ हजारांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत दिल्लीत १,३३० नवे रुग्ण आढळले. तर, संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या २६,३३४ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४१७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १०,३१५ रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत या विषाणूमुळे २५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ४ मे ते २ जून या काळात ३३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद उशिरा करण्यात आली. त्यामुळे मृतांचा आकडा आता ७०८ वर पोहोचला आहे.
दरम्यान, कोरोनाने बळी घेतलेल्या पोलिस कर्मचार्यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारने ६५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. राज्यातील कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्या प्रत्येक पोलिस कर्मचार्याच्या कुटुंबाला ६५-६५ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात येतील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी जाहीर केले. याशिवाय कुटुंबातील सदस्यालाही सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे कमीतकमी ३१ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत राज्यात ८०,२२९ लोकांना करोनाची लागण झाली असून, त्यांपैकी २,८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment