India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Saturday, June 6, 2020

UNSC मध्ये भारताची निवड निश्चित; जयशंकर यांनी सांगितला अजेंडा

UNSC मध्ये भारताची निवड निश्चित; जयशंकर यांनी सांगितला अजेंडा

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बिगर स्थायी सदस्य म्हणून भारताची निवड निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी
भारताचा अजेंडा सांगितला आणि प्रचाराची सुरुवात केली. भारत यावेळी आशिया-प्रशांत समुहातून एकमेव देश असल्यामुळे बिनविरोध निवड
होण्याची शक्यता आहे. 

UNSC मध्ये भारताची निवड निश्चित; जयशंकर यांनी सांगितला अजेंडा
UNSC मध्ये भारताची निवड निश्चित; जयशंकर यांनी सांगितला अजेंडा

नवी दिल्ली : भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजेच यूएनएससीचा बिगर स्थायी सदस्य होण्यासाठी सज्ज आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेकडून १७ जूनला मतदान होईल. या निवडणुकीत १० बिगर स्थायी सदस्यांपैकी ५ सदस्यांच्या निवडणुकीत भारत बिनविरोध सदस्य आहे. भारत बिनविरोध असला तरीही परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी यूएनएससीमध्ये भारताची जागा सुनिश्चित करण्यासाठी अभियान सुरू केलं आहे.


आशिया-प्रशांत समूह क्षेत्रात भारत यावेळी एकमेव उमेदवार आहे. त्यामुळे भारताचा विजय निश्चित आहे. एस जयशंकर यांनी शुक्रवारी ब्रोशर जारी करत यूएनएससीमध्ये भारताच्या प्राथमिकता जाहीर केल्या. यापूर्वीही भारताने यूएनएससीमध्ये बिगर स्थायी सदस्य म्हणून २११ आणि २०१२ या दरम्यान काम केलं आहे.



दहा वर्षांपूर्वीही भारताची यूएनएससीसाठी निवड झाली होती. आपण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी चार विविध आव्हानांचा सामना करत आहोत. अंतर्गत शासनच्या सामान्य प्रक्रियेतील तणावातही वाढ होत आहे, असं जयशंकर म्हणाले. करोना व्हायरससारख्या संकटामुळे जागतिक समुदाय अत्यंत संकटात आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये निवडून आल्यानंतर भारताचा ५ एस म्हणजेच संन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी हाच जगासाठी दृष्टीकोन असेल.


आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तातडीने सुधारणांची गरजही जयशंकर यांनी बोलून दाखवली. या परिस्थितीमध्ये भारत एक सकारात्मक जागतिक भूमिका निभावणारा देश आहे. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर केला आहे. आम्ही जागतिक मुद्द्यांवर बातचित, समाधान आणि निष्पक्षतेच्या बाजूने आहोत आणि आम्ही जागतिक विकासावर जोर देतो, असं ते म्हणाले.


दरम्यान, भारताने आतापर्यंत सात वेळा यूएनएससीचा बिगर स्थायी सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. १९५०-१९५१, १९६७-१९६८, १९७२-१९७३, १९७७-१९७८, १९८४-१९८५, १९९१-१९९२ आणि २०११-२०१२ अशा सात वेळा भारताने प्रतिनिधित्व केलं.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages