India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, June 7, 2020

Sonu soud latest news | हा' आहे सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता; संजय राऊतांनी उघड केले नाव

Sonu soud latest news

'हा' आहे सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता; संजय राऊतांनी उघड केले नाव


हजारो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याचा दावा करणारा अभिनेता सोनू सूद यांच्या मागचा कर्ताधर्ता वेगळाच आहे, असं शिवसेना

 नेते संजय राऊत यांनी म्हटलंय.

Sonu soud latest news

सोनू सूद-संजय राऊत

सोनू सूद-संजय राऊत

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवणारा अभिनेता सोनू सूद याचे सर्वत्र कौतुक होत असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्याच्याबाबत वेगळाच सूर लावला आहे. 'सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच आहे,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे'

Sonu soud latest news


शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. करोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. 'सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत आहे,' असा दावा राऊत यांनी केला आहे.

वाचा: 'सोनू सूद प्रकरण नक्की काय आहे? हा महात्मा अचानक कसा आला?'

Sonu soud latest news

'महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, पोलीस, पालिका कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, बँक कर्मचारी गेल्या तीन महिन्यांत जिवावर उदार होऊन करोनाशी लढत आहेत. मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था मुंबई पालिका व इतर अनेक सामाजिक संस्था करीत आहेत. त्या सगळ्यांची यादी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राजभवन प्रशासनाकडे पाठवायला हवी. हे सगळे अंधारात राहिले. कारण ते सेवाभावाने काम करीत राहिले. ते सोशल माध्यमांवर चमकले नाहीत व त्यांच्या कार्याच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांनी नेमलेल्या ‘प्रसिद्धी’ कंपन्या उतरल्या नाहीत,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.

करोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय,' अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय.
maharashtra times

'सोनू रोज मुंबईत फसलेल्या एक हजार बाराशे मजुरांना त्यांच्या घरी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, मध्य प्रदेशात बसने पोहोचवत होता. त्यापैकी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मजुरांना इतक्यात पाठवू नका असे बजावले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज करोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही आपल्या राज्यात घ्यायला तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कोठे?,' अशी विचारणाही राऊत यांनी केली आहे.


Sonu soud latest news

'त्यांचे' दान गुप्तच राहिले!

सोनू सूद याला सामाजिक कार्याची तळमळ असेलही. त्याने रस्त्यावर उतरून जे काम केले, भले ते ‘प्रायोजित’ असेल, पण इतर अनेक अभिनेते, क्रिकेटपटूंनीही, मग ते सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर वगैरे असतील, या सगळ्यांनी करोना काळात कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या ‘पेन्शन’च्या रकमा, पगाराचे धनादेश या कार्यासाठी जमा केले. लहान मुलांनी वाढदिवसाचा ‘खर्च’ टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. याच पैशातून लाखो मजुरांच्या राहण्या-खाण्याची, पुढच्या प्रवासाची व्यवस्था झाली. त्यापैकी अनेकांचे ‘दान’ गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते,' अशी खोचक टीकाही राऊत यांनी केली आहे.
Sonu soud latest news | हा' आहे सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता; संजय राऊतांनी उघड केले नाव

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages