India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, June 25, 2020

गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

NCP Protest against

 Padalkar Live | 

गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (24 जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका (NCP Protest against Gopichand Padalkar) केली आहे.
NCP Protest against  Padalkar Live |  गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (24 जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका (NCP Protest against Gopichand Padalkar) केली आहे.  India 24 Hours News
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (24 जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका (NCP Protest against Gopichand Padalkar) केली. मात्र ही टीका आता पडळकर यांना भोवणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला (NCP Protest against Gopichand Padalkar) आहे.
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.
गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने राज्यभरात ठिकठिकाणी  आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल 

 बारामती : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात गुन्हा दाखल. बारामती शहर पोलिस ठाण्यात कलम ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल.
25/06/2020,12:56PM

सांगलीत गोपिचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन 

सांगलीत गोपिचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन, पडळकर यांच्या विरोधात सांगलीतून जोरदार निदर्शने, सांगलीतील मिरजेत गोपीचंद पडळकरांच्या फोटोला चप्पलने मारहाण करत फोटो जाळला
25/06/2020,12:27PM

कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध 

कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकरांचा निषेध, शहरातील डेक्कन चौका परिसरात पडळकरांच्या डिजिटल बोर्डाला काळे पासून चपलाचा मार आणि पोस्टर जाळून निषेध, शहरातील राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष नितीन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने
25/06/2020,12:23PM

औरंगाबादमध्ये गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

औरंगाबादमध्येही गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन, औरंगाबादच्या क्रांती चौकात गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध
25/06/2020,12:18PM

सोलापुरात गाढवावर पडळकरांचा फोटो लावून निदर्शने 

सोलापुरात गाढवावर पडळकरांचा फोटो लावून निदर्शने भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राज्यभर तीव्र विरोध, पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध, सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची चार पुतळा चौक परिसरात जोरदार निदर्शने, गाढवावर गोपीचंद पडळकरांचा फोटो लावून चपलांचा हार घालत निषेध
25/06/2020,12:14PM

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन 

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरु, कार्यकर्त्यांडून पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी
25/06/2020,11:52AM

वसईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तीव्र संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन 

वसईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा तीव्र संताप, पडळकरांच्या पुतळ्याचे दहन, वसईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोनल, वसईच्या नवघर बस आगारात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, राष्ट्रवादीचे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

गाढवावर आमदार पडळकर यांचा फोटो लावून राष्ट्रवादीकडून निषेध 

सोलापूर – आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक, गाढवावर आमदार पडळकर यांचा फोटो लावून केला निषेध

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आंदोलनाला सुरुवात 

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आंदोलनाला सुरुवात, अकोल्यात गोपीचंद पडळकरांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यकर्त्यांनी दिल्या पडळकर मुर्दाबादच्या घोषणा
25/06/2020,10:55AM
25/06/2020,11:21AM

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages