Bjp counter attack on Shivsena
हाच का तुमचा माणुसकीचा धर्म?; भाजपचा राऊतांवर पलटवार
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेता सोनू सूद याच्यावर केलेल्या आरोपांना भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (BJP slams Sanjay
Raut for criticising Sonu Sood)
Bjp counter attack on Shivsena
मुंबई: 'स्वत: काही करायचं नाही आणि सोनू सूद सारखे लोक पुढं येऊन गोरगरिबांना मदत करत असतील तर त्यांच्यावर टीका करायची. हाच का तुमचा माणुसकीचा धर्म?,' असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना केला आहे. (BJP slams Sanjay Raut for criticising Sonu Sood)
वाचा: 'सोनू सूद प्रकरण नक्की काय आहे? हा महात्मा अचानक कसा आला?'
लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील अनेक स्थलांतरीत मजुरांना मदत केल्याबद्दल अभिनेता सोनू सूद सध्या चर्चेत आहे. लॉकडाऊनमुळं मुंबईत अडकलेल्या हजारो मजुरांना सोनूनं त्यांच्या घरी पाठवलं आहे. त्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका माणसाला जे जमतं ते सरकारला का जमत नाही, असा प्रश्नही सोशल मीडियावर विचारला जात आहे. मात्र, संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'त लिहिलेल्या एका लेखातून सोनू सूदच्या एकूण कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्यासाठीच सोनू सूदचा वापर करून घेतला जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. करोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. करोनाच्या काळात अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटींनी केलंय. पण त्यांचे दान गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.Bjp counter attack on Shivsena
वाचा: 'हा' आहे सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता; राऊतांनी उघड केले नावBjp counter attack on Shivsena
1/1 स्वतःही करायचं नाही @SonuSood सारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करत असतील त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर @rautsanjay61 टीका ? हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?
1/2 ..संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या @rautsanjay61 @OfficeofUT @CMOMaharashtra
No comments:
Post a Comment