jyodiraditya scindhia Latest News
ज्योतिरादित्य शिंदे 'भाजप'पासून दूर? हे आहे सत्य
शनिवारी अचानक मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य शिंदे ट्विटरवर चर्चेत आले... ज्योतिरादित्य शिंदे भाजपपासून दूर होत असल्याची चर्चा सोशल
मीडियावर रंगली होती... त्याचं कारण होतं ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्विटर अकाऊंटचा एक स्क्रीनशॉट
jyodiraditya scindhia Latest News?
jyodiraditya scindhia Latest News?
jyodiraditya scindhia Latest News?
Sadly, false news travels faster than the truth.
10.7K people are talking about this
खरं म्हणजे, ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर भाजपचा उल्लेख याआधीही केलेला नव्हता. त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर केवळ 'पब्लिक सर्व्हंट' आणि 'क्रिकेट एन्थुझियास्ट' असा अशी आपली ओळख करून दिलीय. याआधीही त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर हेच दिसत होतं... भाजपचा उल्लेख त्यांनी याआधीही केला नव्हता.
उल्लेखनीय म्हणजे, ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेच्या मैदानात उतरले आहेत. मध्य प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी यांना संधी मिळालीय. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांच्यासोबत फूल सिंह बरैया यांना तिकीट देण्यात आलंय. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिली जागा पक्की असल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जातोय.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडताना आपल्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनाही फोडलं होतं. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरुद्ध बंड करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी मार्च महिन्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यामुळे राज्यात कमलनाथ सरकार कोसळलं. काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर राजकारणाचं संपूर्ण गणितंच पालटलं आणि मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमळ' यशस्वी ठरलं.
उल्लेखनीय म्हणजे, सोशल मीडिया ट्विटरवर नोव्हेंबर महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या फॉलोअर्सची संख्या १.९ मिलियन होती परंतु, आत्ता मात्र त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ३ मिलियनवर पोहचलीय.
No comments:
Post a Comment