India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, June 26, 2020

Big news! Important decision of Thackeray government for final year students |मोठी बातमी! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मोठी बातमी! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.
Big news! Important decision of Thackeray government for final year students.


India 24 Hours News
मोठी बातमी! अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.  Big news! Important decision of Thackeray government for final year students.      India 24 Hours News






मुंबई: कोरोना संकट काळातराज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करत असल्याची माहिती ठाकरे सरकारनं पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे दिली आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येईल. यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असं आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आलं आहे.



मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंनी याआधी पंतप्रधान मोदींनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचं आवाहन पत्राद्वारे केलं होतं. एमडी, एमएस, डीएम परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश मोदींनी मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्रातून केली होती. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी कोरोना संकटाच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. निवासी डॉक्टर म्हणून ते सध्या मोलाची कामगिरी करत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी केली होती.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages