करोनामुळे सर्वात प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका वरच्या स्थानावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत १९ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. तर अमेरिकेत एक लाख ११ हजार ३९० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेत १० लाख लोकसंख्येमागे ३३५ जणांचा करोनाने बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत साडे चार लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मातही केली आहे.
करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेले देश
भारतात रुग्णवाढीचा वेग कायम
गेल्या काही दिवसात भारतात रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. देशात प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची लोकसंख्या इतर देशांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हा दर कमी आहे. इटलीशी तुलना केली तर इटलीत प्रति १० लाख लोकसंख्येमागे ५५९ जणांचा मृत्यू झाला. तर इटलीत १ लाख ६४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील करोना उद्रेकाचा वेग पाहिला तर येत्या काळात भारत युरोपियन देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे. ब्रिटन आणि स्पेनला मागे टाकत भारत पुढील काही दिवसात सर्वात प्रभावित चौथा देश ठरू शकतो.
देशात करोनाची आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ; केंद्राने जाहीर केली आकडेवारी
शुक्रवारी एकाच दिवसात सर्वाधिक केस समोर येण्याचा नवा विक्रम झाला. तर सर्वाधिक मृत्यूंचीही नोंद करण्यात आली. शुक्रवारी देशात २९५ रुग्णांचा करोनाने बळी घेतला, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त भीतीदायक आकडा आहे. भारताने मृत्यू दर नियंत्रणात ठेवला असला तरी संक्रमणाचा दर हा आवाक्याच्या बाहेर गेल्याचं चित्र आहे. देशातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं चित्र असतानाच ही वाढ चिंता वाढवणारी आहे.
No comments:
Post a Comment