India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Thursday, May 28, 2020

आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कामात सहकारी सदस्य म्हणून डॉ सुनील गंधे यांची निवड.

आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कामात सहकारी सदस्य म्हणून डॉ सुनील गंधे यांची निवड.

आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कामात सहकारी सदस्य म्हणून डॉ सुनील गंधे यांची निवड.

        जगात कोरोना ने थैमान आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कामात सहकारी सदस्य म्हणून डॉ सुनील गंधे यांची निवड. आहे तसेच मुंबईसह महाराष्ट्रात कोव्हीड १९ रुग्णांच्या संख्येत  लक्षणीय वाढ झाली आहे. लाॅकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, कोवीड हाॅस्पीटल्स या योजनांचा प्रभावी वापर करूनही ही कोरोना साथ आटोक्यात येत नाही. 

अशा परिस्थितीत माननीय आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या कार्याला जखणगांव ता नगर जिल्हा अहमदनगर येथील प्रदिर्घ अनुभवी डॉ सुनील गंधे यांची मदत होईल या हेतूने महाराष्ट्र राज्य कोरोना कंट्रोल रुम मार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांच्या निर्देशानुसार डॉ सुनील गंधे यांची आरोग्य मंत्र्यांचा मदतनीस सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. डॉ सुनील गंधे हे गरिबांचे डॉक्टर म्हणून देशात सुपरिचित आहेत. 

पैसा असो किंवा नसो पैशाअभावी उपचार केला नाही असे डॉक्टर गंधे यांच्या बाबतीत एकही उदाहरण नाही. डॉ. सुनील गंधे हे आरोग्य सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर आहेत. मोफत सामुदायिक विवाह सोहळा, मोफत आरोग्य शिबिरे, महिला कुस्ती  हंगाम, ग्रामविकास, भ्रष्टाचार विरोधी काम, समाजप्रबोधन, वारकरी संप्रदायातील सेवा, सर्व धर्म समभाव, मोफत जनावरांची छावणी यासारख्या अनेक उपक्रमामुळे डॉ सुनील गंधे यांचे नाव आदराने घेतले जाते. 

                  कोरोना प्रतिबंधात्मक समिती चे ते सदस्य असून कोरोना बदल जनजागृती, लोकसहभाग, समुपदेशन, उपचार व प्रशासनास संपुर्ण सहकार्य केल्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. 
             या निमित्ताने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काम करत असणाऱ्या डॉ सुनील गंधे यांच्यामार्फत सर्व सामान्य जनतेच्या समस्या , भावना व त्यावरील उपाय  प्रत्यक्ष मंत्रीमहोदयापर्यत पोहचवण्यात व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास मोठी मदत होणार आहे. या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी डॉ सुनील गंधे यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ . सुनील गंधे यांनी आपल्या जन्मभूमी जखणगांवचे नाव कानाकोपऱ्यात पोहचवले असून .अशा सच्या समाजसेवकाला आता पर्यन्त शेकडो राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत . डॉ . सुनीलजी गंधे यांच्या निवडीमुळे नगर तालुका च्या ग्रामिण भागाला मोठे योगदान मिळेल 

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages