India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 26, 2020

२ लाख कोटींच्या मदतीचा फडणवीसांचा दावा फसवा: पृथ्वीराज चव्हाण | Prithviraj Chavan Challenges Fadnavis | Maharashtra News

महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून २ लाख कोटी मिळाल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली

२ लाख कोटींच्या मदतीचा फडणवीसांचा दावा फसवा: पृथ्वीराज चव्हाण |  Prithviraj Chavan Challenges Fadnavis | Maharashtra News

२ लाख कोटींच्या मदतीचा फडणवीसांचा दावा फसवा: पृथ्वीराज चव्हाण |  Prithviraj Chavan Challenges Fadnavis | Maharashtra NewsPolitical News

आहे. (Prithviraj Chavan Challenges Fadnavis)


कराड: 'केंद्र सरकारनं महाराष्ट्राला २ लाख ७० हजार कोटी रुपये दिल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा आहे. केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज हे कर्जाधारित असून त्यात अनेक अटी व शर्ती आहेत. त्यामुळं फडणवीसांनी कर्ज किती आणि रोख रक्कम किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी,' असं आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे


मोदी सरकारनं महाराष्ट्राला कशी मदत केली याची आकडेवारी काल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिली होती. महाविकास आघाडीचे नेत्यांनी फडणवीसांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रक प्रसिद्ध करून फडणवीसांच्या आकडेवारीतील फोलपणा दाखवून दिला आहे. 'केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये फक्त २ लाख कोटी रुपये हे रोख रकमेचे आहेत. उर्वरीत पॅकेज हे कर्जाच्या स्वरूपातील आहे. हे पाहता महाराष्ट्राच्या वाट्याला फारतर २० हजार कोटी रुपये येऊ शकतात. फडणवीस मात्र २ लाख कोटी थेट राज्याच्या तिजोरीत येणार असल्याचं भासवत आहेत,' असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्राच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार असून ही रक्कम १ लाख ६० हजार कोटी आहे, असं फडणवीसांचं म्हणणं आहे. हे साफ खोटं आहे. जीएसडीपीच्या ३ टक्के रक्कम आरबीआयकडून घेण्याची परवानगी राज्यांना आधीपासूनच होती. ती आता २ टक्क्यांनी वाढवली असली तरी त्यातील फक्त अर्धा टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार कोटी तातडीनं मिळू शकतात. उर्वरीत दीड टक्के (सुमारे ४५ हजार कोटी) रकमेसाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत,' असंही चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages