India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण

Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण...


दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Delhi Healh Minister).
Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण  दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Delhi Healh Minister).  India 24 Hours News
Your Delhi MLA and educationist Atishi has also been found to be infected with corona.
I     
नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Delhi Health Minister). त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या कार्यालयानेच ही अधिकृत माहिती दिली आहे. यासोबतच दिल्लीतील आपच्या आमदार आणि शिक्षणतज्ज्ञ आतिशी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आला आहे. यानंतर त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे.
सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची काल कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आज पुन्हा चाचणी केल्यानंतर दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
आमदार आतिशी यांना मंगळवारपासून (16 जून) सर्दी-खोकला ही लक्षणं दिसली. यानंतर तात्काळ त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. आज याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी तात्काळ स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. सध्या आतिशी यांची लक्षणं सामान्य आहेत. आतिशी कोरोना प्रकरणांवर आरोग्य विभागासोबत काम करत होत्या. 11 जून रोजी आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर 11 जूनपासूनच आतिशी यांनी स्वतःला घरात वेगळं केलं.
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal COVID 19 Tests) यांना देखील कोरोनाची लक्षणं दिसली होती. यानंतर त्यांचीही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा यांनी ही माहिती दिली होती (Delhi CM Arvind Kejriwal Tests Negative For COVID-19).
अरविंद केजरीवाल यांना ताप आला होता आणि त्यांच्या घशात खवखवत होतं, त्यामुळे त्यांनी रविवारपासून (7 जून) स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages