सुशांत सिंह राजपूतच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट्स आले समोर
सुशांत सिंहच्या अंतिम संस्काराआधी त्याचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट्स आले आहे. निधन झाल्यानंतर त्याचे सँपल्स घेण्यात आले होते.
सुशांत सिंह राजपूतच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट्स आले समोर
थोडं पण कामाचं
- रविवारी सुशांतने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली
- जवळच्यांनी खुलासा केला की बऱ्याच काळापासून सुशांत तणावात होता
- पोस्टमार्टम करण्याआधी कोरोनाच्या चाचणीसाठी गेले होते सँपल
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh Rajput) वर अंत्यसंस्कार करण्याआधी त्याच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट्स आले आहेत. निधनानंतर त्याचे सँपल्स कोरोना टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला कोरोना झाला नव्हता. त्याच्या कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. त्याच्या पोस्टमार्टम आधी स्वाब सँपल घेतले होते.
संपूर्ण जगात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. लाखोच्या संख्येने लोक कोरोनाग्रस्त होत आहेत. भारतात तब्बल तीन लाख लोक कोरोनाग्रस्त झाले आहेत तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. यातच शासनाकडून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी व्हावी यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात आहेत. याच कारणामुळे सुशांत सिंग राजपूतचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
गळफास लावून घेत सुशांतची आत्महत्या
३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंहने रविवारी वांद्रे स्थित आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी त्याने आत्महत्या केली. त्याच्या निधनाची बातमी ऐकताच साऱ्यांनाच धक्का बसला. क्रीडा जगतापासून ते संपूर्ण बॉलिवूड या बातमीने हळहळले. सुशांतसारखा गुणी अभिनेता असे पाऊल उचलू शकतो यावर कोणाचा विश्वासच बसत नाही आहे. कोरोनामुळे अनेकांना त्याचे अंत्य दर्शनही घेता आले नाही.
तणावात होता सुशांत सिंह राजपूत
सुशांत सिंह राजपूतने हे धक्कादायक पाऊल उचलण्यापूर्वी आपला मित्र महेश शेट्टीला कॉल केला होता. पवित्र रिश्तामध्ये काम केल्यानंतर सुशांतला महेशला आपला भाऊ मानत होता. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार महेश शेट्टीने पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले की सुशांत सिंह राजपूत तणावात गेला. गेल्या काही दिवसांपासून त्याने अँटी-डिप्रेशनची औषधे घेणेही बंद केले होते.
सुशांतचा छिछोरे हा अखेरचा सिनेमा. त्यात तो शेवटचा दिसला होता. सुशांतची कारकीर्द ऐन बहरात असताना त्याने आपल्या जीवनाचा असा का शेवट केला याचे साऱ्यांनाच आश्चर्य आहे. प्रत्येकाला विचार करायला लावणारे पाऊल त्याने का उचलले असावे. आयुष्यात असे काहीच नव्हते का की जे त्याला आत्महत्या करण्यापासून रोखू शकले असते असेच प्रश्न साऱ्यांच्या मनात आहेत.
No comments:
Post a Comment