earth quake delhi india news
दिल्ली-एनसीआरला गेल्या दोन वर्षांच्या काळात भूकंपाचे ७२ पेक्षा अधिक लहान-मोठे धक्के बसले आहेत. सततचे छोटे धक्के बसणे हे मोठया भूकंपाचा संकेत असल्याचे आयआयटीच्या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
दिल्ली-एनसीआरला गेल्या दोन वर्षांच्या काळात भूकंपाचे ७२ पेक्षा अधिक लहान-मोठे धक्के बसले आहेत. सततचे छोटे धक्के बसणे हे मोठया भूकंपाचा संकेत असल्याचे आयआयटीच्या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.
|
देशाच्या 'या' भागात येऊ शकतो मोठा भूकंप; तज्ज्ञांचा इशारा | earth quake delhi india news
नवी दिल्ली / रांची: गेल्या दोन महिन्यांत दिल्ली अनेक वेळा भूकंपाच्या धक्क्यांनी थरथरली आहे. भूकंपाचे हे धक्के हलके असले तरी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र, आता दिल्ली-एनसीआरमध्ये मोठा भूकंप होण्याचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत. छोटे भूकंप हे मोठ्या भूकंपाचे लक्षण आहे, असे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे घडले. येत्या काही दिवसांत दिल्ली आणि एनसीआरमध्ये तीव्रतेचा भूकंप येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आयआयटी धनबादच्या एप्लाइड जिओफिजिक्स अँड सिस्मोलॉजी विभागांने दीर्घ संशोधनानंतर हा इशारा दिला आहे.
दिल्ली आणि आसपासच्या भागात जमा होत आहे ऊर्जा
आयआयटी धनबाद येथील भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख पी. के खान यांनी माहिती देताना सांगितले की, 'कमी तीव्रतेचे वारंवार धक्का बसणे ही मोठ्या भूकंपाचे लक्षण आहे. गेल्या दोन वर्षांत दिल्ली-एनसीआरमध्ये रिश्टर स्केलवर ४ ते ४.९ इतक्या तीव्रतेचे एकूण ६४ भूकंप झाले आहेत. त्याचवेळी, पाचपेक्षा जास्त तीव्रतेचे भूकंप ८ वेळा झाले आहेत'. हे पाहता त्या भागातील ऊर्जा विशेषत: नवी दिल्ली आणि कांगडाजवळ ऊर्जा वाढत आहे, असे खान यांचे म्हणणे आहे.
दिल्ली फॉल्ट लाईनच्या अगदी जवळ
एनसीआर ते उत्तरकाशी हे अंतर फक्त २६० किमी आहे. तर, कांगडा हे ३७० किमी दूर आहे. दोन्ही भाग धोकादायक भूकंपांसाठी प्रसिध्द आहेत. या फॉल्ट लाइनवरील मोठ्या भूकंपाचा परिणाम एनसीआरवर होऊ शकतो, असे प्राध्यापक खान म्हणाले. कांगडाजवळील चंबा येथे सन १९४५ मध्ये ६.३ तीव्रतेचा तीव्रतेचा भूकंप झाला. सन १९०५ मध्ये जवळच असलेल्या धर्मशाला येथे ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता.
देशाच्या 'या' भागात येऊ शकतो मोठा भूकंप; तज्ज्ञांचा इशारा | earth quake delhi india news
उत्तरकाशीहून येऊ शकतो मोठा धोका
आयआयटीच्या प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडील भूकंपप्रवणतेचे क्षेत्र छोटे आहे. उत्तरकाशीजवळ गढवालमध्ये भूकंपाच्या दृष्टीने एक निष्क्रिय भूभाग आहे. येथे १८०३ मध्ये ७.७ तीव्रतेचा, तर सन १९९१ मध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप आला होता. वाढते शहरीकरण आणि बांधकाम व्यावसायिकांनी भूकंप मापदंडांचे पालन न केल्याने एनसीआरसाठी मोठा भूकंप मोठे नुकसान करणारा ठरू शकतो. दिल्ली-हरिद्वार पट्ट्यात हालचाल सुरू आहे. दरवर्षी या ४४ मिमीच्या हालचालींची नोंद होत असते, असे खान म्हणाले.
|
No comments:
Post a Comment