breaking news india china border......,
china india border news today.....
india china border issue latest news ......,
चीननंतर भारताचा 'या' देशासोबतचा सीमा प्रश्न चिघळणार?....,
india china border issue latest news.......
भारताच्या विरोधानंतरही नेपाळने भारताच्या भूभागावर दावा करणारे संविधान संशोधन विधेयक मंजूर केले आहे. संसदेने या विधेयकाला
मंजुरी दिली असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची औपचारिकता उरली आहे.
breaking news india china border
china india border conflict latest news |
काठमांडू: भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावरून तणाव निर्माण झाला असताना आता नेपाळसोबतही संबंध तणावपूर्ण होण्याची परिस्थिती आहे. भारताच्या भूभागावर दावा करणाऱ्या नव्या नकाशाला नेपाळच्या संसदेने मंजुरी दिली आहे. या नकाशानुसार, नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भूभागावर दावा केला आहे.नेपाळचे कायदा मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री शिवमाया थुम्भांगफे यांनी हे संविधान संशोधन विधेयक सभागृहात मांडले. संसदेने या संविधान संशोधनाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्या मंजुरीची औपचारिकता शिल्लक राहिला आहे. त्यांनी स्वाक्षरी केल्यानंतर नेपाळचा नवीन नकाशा अस्तित्वात येणार आहे. संसदेत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी भारताला सीमा प्रश्नी चर्चा करण्याचे आवाहन केले.
नवीन नकाशाबाबतचे संविधान संशोधन विधेयक मागील महिन्यात संसदेत मांडले जाणार होते. मात्र, सर्वपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे नेपाळचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. त्यामुळे हे विधेयक संसदेत मांडण्यात आले नव्हते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेपाळ काँग्रेसने या विधेयकावर विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यांनीदेखील पाठिंबा दिल्यानंतर नकाशा दुरुस्तीबाबतचे विधेयक संसदेत मांडण्यात आले.
या नव्या नकाशानुसार, लिपुलेख, कालापानी, लिंपियाधुरा आदी भाग हे नेपाळमध्ये दाखवण्यात आले आहेत. हे भाग भारताकडे आहेत. नेपाळच्या आगळकीवर भारताने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. लिपुलेख या भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. नेपाळचा हा नवीन नकाशा सर्व शासकीय विभाग आणि शाळांमध्ये वापरण्यात येणार आहे. नेपाळने भारताच्या ३९५ चौकिमी क्षेत्रफळावर दावा करताना लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी भागाशिवाय गुंजी, नाभी आणि कुटी गावांचाही समावेश केला आहे.
india china border issue latest news | चीननंतर भारताचा 'या' देशासोबतचा सीमा प्रश्न चिघळणार? | india china border issue latest news |china india border news today
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मागील महिन्यात ८० किलोमीटर लांब असलेल्या लिपुलेख येथील रस्त्याचे उद्घाटन केले होते. हा मार्ग तिबेट येथे जाण्यासाठी सोयीचा समजला जातो. लिपुलेखच्या परिसरावर नेपाळने आपला दावा केला आहे. भारताने नेपाळचा दावा फेटाळून लावला आहे. भारताने आपल्या हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण केले असून नेपाळने आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे. लिपुलेख भागात भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमा एकत्र येतात. त्यामुळेच चीन नेपाळचा वापर करून भारतविरोधी पावले उचलत असल्याची चर्चा सुरू आहे.
No comments:
Post a Comment