India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 26, 2020

भारत-चीन सीमेवर तणाव; अजित डोवल यांनी PM मोदींना दिला अहवाल | India News

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पूर्व लडाखमधील बदलत्या स्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. महत्त्वाकांक्षी सैन्य सुधारणा आणि युद्ध क्षमता वाढवण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींसोबतची ही बैठक आधीपासूनच ठरलेली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पँगोंग लेक, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथे दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून तिथे तणाव आहे.

भारत-चीन सीमेवर तणाव; अजित डोवल यांनी PM मोदींना दिला अहवाल | India News
भारत-चीन सीमेवर तणाव; अजित डोवल यांनी PM मोदींना दिला अहवाल | India News

नवी दिल्लीः लडाखच्या पूर्व भागात भारत-चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरू होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. बाहेरील सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तयारीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या आधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. दुसरीकडे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश दिलेत.

लडाखमधील स्थितीची PM मोदींना दिली माहिती

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्याच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी पूर्व लडाखमधील बदलत्या स्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. महत्त्वाकांक्षी सैन्य सुधारणा आणि युद्ध क्षमता वाढवण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींसोबतची ही बैठक आधीपासूनच ठरलेली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पँगोंग लेक, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथे दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून तिथे तणाव आहे.

डोभाल यांची लडाख-सिक्कमीपर्यंत नजर

पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या बैठकीबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पूर्व लडाख आणि उत्तर सिक्कीम आणि उत्तरखंडमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) स्थितीवर बारकाईने लक्ष आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर चीनची लष्करी दबावाची रणनिती भारत यशस्वी ठरू देणार नाही. एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती.

बैठकीत तिन्ही दलांच्या प्रमुखांनी एलएसीसह पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कुठले प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यांची सध्याची स्थिती काय आहे, याची माहिती दिली. चीनशी लागून असलेल्या ३५०० किलोमीटर लांबीच्या सीमेवरील सामरिक ठिकाणांचा विकासाच्या योजना भारत रोखणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण पूर्व लडाखसह इतर ठिकाणी विकास कामांमध्ये आडकाठी घालून मोठा वाद निर्माण करण्याचा चीन डाव आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages