India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 26, 2020

मुंबईतून आलेल्या ‘SRPF’च्या २० पोलिसांना करोना | Police Corona News| Mumbai News

मुंबई येथे बंदोबस्त करून आलेल्या रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) ग्रुप क्रमांक दोन कंपनीतील २० पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. अद्याप ३३ पोलिसांचे अहवाल येणे बाकी आहे.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे रामटेकडी येथील 'एसआरपीएफ दोन'ची एक कंपनी बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेली होती. या कंपनीत साधारण ९० कर्मचारी आहेत. ही कंपनी घाटकोर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होती. बंदोबस्त केल्यानंतर १९ मे रोजी ही कंपनी पुण्यात आली होती. त्यानंतर २१ मे रोजी या कंपनीतील काही पोलिसांना करोनाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे या कंपनीतील २० जणांचे स्वॅब सुरुवातीला घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी आणखी १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर राव नर्सिंग होम येथे उपचार सुरू आहेत. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या ३३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती 'ग्रुप दोन'चे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages