India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 17, 2020

Ahmednagar News | बोल्हेगाव फाटा येथील एकाला कोरोना | नगर जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली


 Ahmednagar News............

 बोल्हेगाव फाटा येथील एकाला कोरोना | नगर  जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली

INDIA 24 HOURS NEWS
Ahmednagar News   बोल्हेगाव फाटा येथील एकाला कोरोना | नगर  जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली    INDIA 24 HOURS NEWS
 बोल्हेगाव फाटा येथील एकाला कोरोना |



नगर : जिल्ह्यात आज तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बोल्हेगाव फाटा (नगर), शेवगाव आणि राहाता येथील हे रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २६१ झाली आहे.


कुर्ला नेहरूनगर मुंबई येथून भावी निमगाव ( शेवगाव) येथे आलेला ४१ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती चालक म्हणून काम करत होती. १४ जूनला ही व्यक्ती मुंबईहून गावी आली होती. ताप आणि श्वसनाच्या त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.


बोल्हेगाव फाटा (अहमदनगर) येथे कोरोना संसर्ग झालेला दुसरा रुग्णही कुर्ला नेहरूनगर येथून आला आहे. ही ४१ वर्षीय व्यक्ती आहे. ही व्यक्ती कुर्ला नेहरूनगर येथे चालक म्हणून काम करत होती. आजाराची लक्षणे जाणवल्याने उपचारासाठी दाखल झाला होता.

खाजगी प्रयोगशाळेत राहाता शहरातील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सात जणांनी कोरोनावर मात केली. संगमनेर ०४, राहाता ०२ आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली २१३ झाली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages