India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 15, 2020

Corona Discharge Patient Maharashtra Update | गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?

गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 56 हजार 049 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Corona Discharge Patient Maharashtra Update)
गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त? कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 56 हजार 049 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Corona Discharge Patient Maharashtra Update) INDIA 24 HOURS NEWS
Corona Discharge Patient Maharashtra Update
मुंबई : राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. आज राज्यातून 5 हजार 071 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात मुंबईतील सर्वाधिक 4 हजार 242 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 56 हजार 049 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Corona Discharge Patient Maharashtra Update)
महाराष्ट्रात 29 मे रोजी एकाच दिवशी 8 हजार 381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. जवळपास 15 दिवसानंतर आता पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.
आज डिस्चार्ज झालेल्या 5 हजार 071 रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक 4 हजार 242 रुग्णांचा समावेश आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 39 हजार 976 इतकी झाली आहे. तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात 568 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 8 हजार 430 इतकी झाली आहे.
आज कुठे किती रुग्ण कोरोनामुक्त?
शहर – आज डिस्चार्ज – (कंसात एकूण कोरोनामुक्त)
  • मुंबई – 4 हजार 242         (39 हजार 976)
  • पुणे –   568                      (8 हजार 430)
  • नाशिक – 100                  (2 हजार 365)
  • औरंगाबाद – 75                (1 हजार 945)
  • कोल्हापूर – 24                  (1 हजार 030)
  • लातूर – 11 –                       (444)
  • अकोला – 22                     (1 हजार 048)
  • नागपूर – 29                      (811)
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर तीन महिन्यानंतर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के इतका झाला आहे. त्यात दिवसंदिवस वाढ होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. (Corona Discharge Patient Maharashtra Update)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages