India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 15, 2020

John Cena pays tribute to Sushant | सुशांतला श्रद्धांजली, जॉन सीनाची पोस्ट व्हायरलं




John Cena pays tribute to Sushant |..... 


सुशांतला श्रद्धांजली, जॉन सीनाची 


पोस्ट व्हायरलं..........

जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर सुशांत सिंह राजपूतचा फोटो शेअर 

केला आहे. (John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)





John Cena pays tribute to Sushant | सुशांतला श्रद्धांजली, जॉन सीनाची पोस्ट व्हायरलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या 
आत्महत्येनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात 
आहे. आता WWE सुपरस्टार जॉन सीनानेही (John Cena) सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे. जॉन सीनाने सुशांतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत, त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हा फोटो शेअर केला आहे. मात्र जॉनने कोणतीही कॅप्शन किंवा प्रतिक्रिया लिहिलेली नाही. (John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)
जॉन सीनाची ही पोस्ट सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेत आहे. जॉन सीनाच्या फॅन्ससह बॉलिवूड आणि सुशांत सिंह राजपूतचे चाहते ही पोस्ट शेअर करत आहेत. या पोस्टसोबत त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबईतील आपल्या घरी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. सुशांतच्या आत्महत्येने बॉलिवूडसह देश हादरुन गेला होता. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याने आत्महत्या का केली याची कारणं आता पोलीस शोधत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चारच दिवसांपूर्वी त्याच्या माजी मॅनेजरनेही आत्महत्या केली होती.
सुशांतच्या वहिनीचंही निधन
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या अकस्मात निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच आणखी एक आघात झाला आहे. सुशांतच्या चुलत वहिनी सुधादेवी यांचेही निधन झाले. सुशांतच्या निधनाचा मोठा धक्का बसल्याने सुधादेवी यांचे देहावसान झाल्याचे बोलले जाते.
सुधादेवी या सुशांतचा चुलत भाऊ अमरेंद्रसिंह याच्या पत्नी. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. मात्र सुशांतच्या निधनाचे वृत्त समजल्यापासून सुधादेवी यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांची शुद्ध सारखी हरपत होती.
(John Cena pays tribute to Sushant Singh Rajput)
संबंधित बातम्या 

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages