Sushant Singh Rajput suicide l
बॉलिवूडमधील दुश्मनीची बाजूही
तपासणार, गृहमंत्र्यांचा थेट इशारा
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही (Anil Deshmukh on Sushant Singh Rajput suicide).
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे (Anil Deshmukh on Sushant Singh Rajput suicide). सुशांतने खरंच आत्महत्या केली की इतर काही कारण आहे? याचा तपास कालपासून मुंबई पोलीस घेत होते. दरम्यान, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, सुशांतने बॉलिवूडमधील व्यवसायिक स्पर्धेसंबंधित इतर काही कारणांमुळे नैराश्यात जावून आत्महत्या केली का? या दृष्टीनेदेखील मुंबई पोलीस चौकशी करतील, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे (Anil Deshmukh on Sushant Singh Rajput suicide).
While the post mortem report says actor @itsSSR committed suicide by hanging himself, there are media reports that he allegedly suffered from clinical depression because of professional rivalry. @MumbaiPolice will probe this angle too.
726 people are talking about this
अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, काही प्रसारमाध्यमांनी चित्रपट सृष्टीतील व्यावसायिक स्पर्धेमुळे जावून त्याने आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस त्यादृष्टीनेदेखील चौकशी करतील”, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
While the post mortem report says actor @itsSSR committed suicide by hanging himself, there are media reports that he allegedly suffered from clinical depression because of professional rivalry. @MumbaiPolice will probe this angle too.
सुशांतने काल (रविवार 14 जून) वांद्र्यातील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतचे शवविच्छेदन काल रात्री करण्यात आले. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळफास बसून श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. जेजे रुग्णालयात उत्तरीय तपासणीत त्याच्या शरीरात ड्रग्ज किंवा विष नसल्याचे स्पष्ट झाले.
सुशांतची कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने त्याच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कंगनाने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं”, असा घणाघात कंगनाने केला.
कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून बॉलिवूडवर टीका केली जात आहे. यादरम्यान, अभिनेते आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनीदेखील केलेलं ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.
“तू ज्या परिस्थितीतून, तणावातून जात होता त्याची मला जाणीव होती. ज्या लोकांनी तुला कमजोर बनवलं, ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडलास, त्या सर्वांची गोष्ट मला ठावूक आहे. गेल्या सहा महिन्यात तुझ्यासोबत एकत्र राहायला हवं होतं, तू निदान माझ्याशी बातचीत तरी केली असतीस. जे काही झालं, ते सर्व इतरांचे कर्म होते, तुझे नाही”, असं शेखर कपूर ट्विटवर म्हणाले.
I knew the pain you were going through. I knew the story of the people that let you down so bad that you would weep on my shoulder. I wish Iwas around the last 6 months. I wish you had reached out to me. What happened to you was their Karma. Not yours. #SushantSinghRajput
24.7K people are talking about this
No comments:
Post a Comment