India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

जगातील सर्वाधिक करोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहावा | India Corona News

देशव्यापी लॉकडाउनला दोन महिने पूर्ण झाले असताना भारतात १ लाख ३८ हजार ८४५ रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातील करोनारुग्णांची संख्या १३ दिवसांत दुप्पट झाली आहे.







जगातील सर्वाधिक करोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहावा | India Corona News
जगातील सर्वाधिक करोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहावा | India Corona News
 


 गेल्या दहा दिवसांत देशातील रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्यामुळे जगातील सर्वाधिक करोनाग्रस्त देशांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. करोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनला दोन महिने पूर्ण झाले असताना भारतात १ लाख ३८ हजार ८४५ रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातील करोनारुग्णांची संख्या १३ दिवसांत दुप्पट झाली आहे.

लॉकडाउनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे लोक बाहेर पडत आहेत. तसेच स्थलांतरित श्रमिकांच्या गावी जाण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे येणाऱ्या दिवसांत करोनारुग्णांची संख्या आणखी वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्यखात्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रासलेल्या लोकांनी अतिसावध राहण्याची, घराबाहेर न पडण्याची काळजी घेतली पाहिजे, असे आरोग्य खात्याच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी करोनारुग्णांच्या एका दिवसातील संख्येने ६ हजारांचा आकडा पार केला. एका दिवसात ६९७७ नव्या रुग्णांची भर पडली.


करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांमध्ये आता भारत दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अमेरिका (१६, ८६,४३६), ब्राझील (३,६५,२१३), रशिया (३,४४,४८१), स्पेन (२,८२,८५२), ब्रिटन (२,५९,५५९), इटली (२,२९,८५८), फ्रान्स (१,८२,५८४), जर्मनी (१,८०,३२८), तुर्कस्तान (१,५६,८२७) आणि भारत (१,३८,८४५) अशी दहा अव्वल करोनाग्रस्त देशांची यादी आहे. दोन महिन्यांपूर्वी, २५ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनची घोषणा केली, तेव्हा भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाचशे होती. दोन महिन्यांत त्यात २७७ पटींनी वाढली आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली. त्यापैकी ५७ हजार ७२१ करोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ४१.५७ आहे. २४ तासांत ३२८० रुग्ण बरे झाले असून सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार १०३ इतकी आहे. गेल्या २४ तासांत करोनाच्या विक्रमी ६९७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर १५४ जणांचा मृत्यू होऊन एकूण मृतांचा आकडा ४०२१ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र ५० हजारांपार
देशव्यापी लॉकडाउनच्या ६२व्या दिवशी देशभरातील १ लाख ३८ हजार ८४५ करोनाग्रस्तांपैकी महाराष्ट्र एकतृतीयांशापेक्षा अधिक रुग्णांसह आघाडीवर आहे. सोमवारी राज्यात २ हजार ४२६ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. राज्यात दिवसभरात ६० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईतील ३८ आणि पुण्यातील ११ जणांचा समावेश आहे. मुंबईतील मृतांच्या आकड्याने हजाराचा टप्पा पार केला आहे.


No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages