India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

मुंबईत आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू; राज्यात १९ जण दगावले |Mumbai police News

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या आरोग्याची पर्वा न करता सेवा बजावत असलेल्या पोलीस दलाला करोनाचा विळखा पडला आहे. यात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत स्थिती अधिकच गंभीर बनत चालली असून मुंबईत आतापर्यंत १२ पोलिसांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे.

मुंबईत आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू; राज्यात १९ जण दगावले |Mumbai police News
मुंबईत आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू; राज्यात १९ जण दगावले |Mumbai police News

मुंबई: पोलिस दलाला करोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असून मुंबई मधील आणखी एका पोलिसाचा करोनाने मृत्यू झाला आहे. वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेले पोलिस कॉन्स्टेबल जयंत खंडाईत (५७) यांचे सोमवारी पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. राज्यातील मृत पोलिसांची संख्या १९ वर पोहोचली असून १८०९ पोलिसांना करोना विषाणूची लागण झाली आहे.

करोनाच्या संकटात आरोग्य सेवेतील योद्धयांप्रमाणे पोलिसही जीवाची बाजी लावून लढत आहेत. बंदोबस्त, गस्त, नाकाबंदी यामुळे पोलिसांचा थेट संपर्क नागरिकांशी येत असल्याने पोलिसांत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई पोलिस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या जयंत खंडाईत यांना करोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईत आतापर्यंत १०२६ करोनाबळी; रुग्णसंख्या पोहचली ३१७८९वर



वाहतूक शाखेत शिक्षण विभागात नेमणुकीला असलेले खंडाईत वरळी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलिस दलातील करोनाने मृत्यू पावलेल्या पोलिसांची संख्या १२ वर पोहोचली असून राज्यात आतापर्यंत १९ पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत १८०९ पोलिसांना करोनची लागण झाली असून यामध्ये १९४ अधिकारी आणि १६१५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ६७८ पोलिस बरे होऊन घरी परतले असून १११३ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा सोमवारी मृत्यू झाला. संबंधित पोलिसाचे यापूर्वीचे सर्व स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र, प्रकृती खालावत जाऊन आज त्यांचा मृत्यू झाला. मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून हा पोलीस घरी परतला होता. जिल्हा पोलिस दलातील हा दुसरा मृत्यू आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages