India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, May 25, 2020

मुंबईत आतापर्यंत १०२६ करोनाबळी; रुग्णसंख्या पोहचली ३१७८९वर | Mumbai Corona News

मुंबईत करोना बाधित रुग्णांचा आकडा मोठा असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही हळूहळू वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात मुंबईतील विविध रुग्णालयांतून करोनाचे ३३० रुग्ण बरे होऊन घरी परतले. ही काहीशी दिलासादायक बाब आहे

मुंबईत आतापर्यंत १०२६ करोनाबळी; रुग्णसंख्या पोहचली ३१७८९वर | Mumbai Corona News
मुंबईत आतापर्यंत १०२६ करोनाबळी; रुग्णसंख्या पोहचली ३१७८९वर | Mumbai Corona News

मुंबई:करोना साथीच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईत आज करोनामुळे आणखी ३८ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील करोनाबळींचा एकूण आकडा एक हजारचा टप्पा ओलांडून १०२६ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पालिका हद्दीत करोनाच्या नवीन १४३० रुग्णांची भर पडली.


मुंबईत काल रविवारी करोनामृत्यूंची संख्या ९८८ इतकी होती. त्यात आज आणखी ३८ मृतांची भर पडल्याने हा आकडा १०२६ इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाचे १४३० नवे रुग्ण आढळले असून रुग्णांचा एकूण आकडा आता ३१,७८९ इतका झाला आहे. दुसरीकडे आज ३३० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले. या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत मुंबईत ८ हजार ४०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.धोका वाढतोय! राज्यात २४३६ नव्या बाधितांची भर; ६० रुग्णांचा दिवसभरात मृत्यू

मुंबई महापालिका हद्दीत करोना सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. आज मुंबईत अशा ८२५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून करोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता २५ हजार ९५६ इतकी झाली आहे.
> मुंबईत गेल्या २४ तासांत मृत पावलेल्या ३८ रुग्णांपैकी २७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. ३८ पैकी २६ रुग्ण पुरुष तर १२ रुग्ण महिला होत्या. मृतांपैकी तीन रुग्ण ४० वर्षांखालील, १५ रुग्ण ६० वर्षांवरील तर बाकीचे २० रुग्ण ४० ते ६० वर्षे यादरम्यानचे होते.


> मुंबईत आतापर्यंत आढळलेल्या करोना बाधित रुग्णांपैकी ४० टक्के महिला तर ६० टक्के पुरुष रुग्ण आहेत. करोनामृत्यूचे हेच प्रमाण महिला- ३७ टक्के तर पुरुष- ६३ टक्के असं आहे. मृतांपैकी ६७ टक्के रुग्णांना इतरही आजार होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेले सर्वाधिक ३२ टक्के रुग्ण दगावले आहेत.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages