करोनाला काय घाबरायचं; ९२ वर्षांची आजी कशी लढली बघा!
आजींना अचानक खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या आजींची काळजी घेणाऱ्या दोघांपैकी एकाला करोनाची लागण झाली
होती. काही दिवसांनी आजींमध्येही ही लक्षणे दिसू लागली, अशी माहिती त्यांचे नातू गौरव यांनी दिली.
करोना संसर्गाची व्याप्ती वाढत असताना वयोवृद्धांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात असतानाच योग्यवेळी वैद्यकीय उपचार सुरू केल्यास व सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास करोनावर मात करणे शक्य असल्याचे उदाहरण मुंबईतील ९२वर्षीय आजींनी घालून दिले आहे. या आजींना गुरुवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.आजींना अचानक खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या आजींची काळजी घेणाऱ्या दोघांपैकी एकाला करोनाची लागण झाली होती. काही दिवसांनी आजींमध्येही ही लक्षणे दिसू लागली, अशी माहिती त्यांचे नातू गौरव यांनी दिली. त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांचा वैद्यकीय अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
No comments:
Post a Comment