India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, June 5, 2020

... म्हणून भारतातून अमेरिकेत आले; सनी लिओनीचं स्पष्टीकरण | news

... म्हणून भारतातून अमेरिकेत आले; सनी लिओनीचं स्पष्टीकरण

बॉलिवूड अभिनेत्री लॉकडाऊन असतानाही अमेरिकेत गेल्यानं तिच्यावर अनेकानी टीका केली होती. एका मुलाखती दरम्यान तिनं अमेरिकेत जाण्याचा निर्णय का घेतला यासंदर्भात खुलासा केला आहे...

सनी लिओनी
सनी लिओनी
मुंबई: करोना व्हायरसनं जगभर थैमान घातलं असताना भारतात राहणं सुरक्षित नाही असं म्हणत पती आणि मुलांसोबत अमेरिकेला गेलेली अभिनेत्री सनी लिओनी हिनं या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. अमेरिका, इटली, युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन सारख्या विकसीत देशांतही करोनामुळं लाखो जण मृत्युमुखी पडलेत. भारतात मात्र परिस्थिती इतकी वाईट नाहीए. असं असताना सनी लिओनी हिलं मुंबईतून थेट मेरिका गाठली.करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी माझ्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिका सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं होतं.


मुंबईतून अमेरिकेत गेल्यानंतर चाहत्यांनी सनीवर प्रचंड टीका केली होती. पण यासंदर्भात तिनं 'टाइम्स ऑफ इंडिला'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. खरं तर मला मुंबई सोडायचीच नव्हती. 'अमेरिकेला यायचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला, या कठीण काळात हा निर्णय घेणं सोप्प नव्हत. पण डॅनिअलच्या आईसाठी हा निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आम्ही इथं अमेरिकेला आलोय',असं सनीनं या मुलाखतीत म्हटलं आहे.
करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.अमेरिकेला गेल्यानंतर सनीच्या पतीनं देखील एक फोटो शेअर करत 'क्वारंटाईन पार्ट २; हे इतकं काही वाईट नाही', असं कॅप्शनही दिलं होतं. सनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक असून २०१२ पासून सनी मुंबईत राहत आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages