Tukaram Munde News|.....,
If it was our government, Tukaram Mundhe would not have come to Nagpur, the mayor claims, serious allegations against the commissioner....
आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे (Nagpur Mayor on Tukaram Mundhe.)
Tukaram Munde News|.....,आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, महापौरांचा दावा, आयुक्तांवर गंभीर आरोप |
नागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये चांगलंच वातावरण तापलं आहे (Nagpur Mayor on Tukaram Mundhe.) त्यातूनच आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातील संघर्ष पेटला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शहरात रुग्णवाढीसाठी मनपा प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले, असा आरोप संदीप जोशी यांनी केला. यावेळी त्यांनी आमचं सरकार असतं, तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते, असंही म्हटलं.
संदीप जोशी म्हणाले, “शहरात रुग्णवाढीसाठी मनपा प्रशासनच जबाबदार आहेत. क्वॉरंटाईन प्रक्रियेतील घोळामुळेच शहरात कोरोना रुग्ण वाढले. भाजपला तुकाराम मुंढेंच्या बदलीत स्वारस्य नाही. ज्यांनी मुंढेंना आणलं तेच याचा परिणाम भोगत आहेत. आमचं सरकार असतं, तर मुंढे नागपुरात आलेच नसते.”
नागपूरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. सध्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा अकराशेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यात महानगरपालिका प्रशासनाचं अपयश आहे. क्वॉरंटाईन करण्याच्या प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहे’ असा आरोप करत नागपूरच्या महापौरांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर थेट निशाना साधलाय.
याधी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी तक्रार केल्यानंतर, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली. मात्र, तुकाराम मुंढे यांच्या बदलीत भाजपला स्वारस्य नाही. ज्यांनी मुंढेंना नागपुरात आणलं, तेच लोक आता त्याचे परिणाम भोगत आहेत. आमचा पक्ष सत्तेत असता, तर तुकाराम मुंढे नागपुरात नसते, अशा शब्दात महापौर जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, नागपुरात काल (मंगळवार, 16 जून) दिवसभरात 13 संशयितांचे कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आले. सुपर हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर सुपरमधील 40 डाॅक्टर आणि नर्सला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नागपूरातील एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1 हजार 78 वर पोहचली आहे. नागपुरातून काल 5 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले. यासह आतापर्यंत उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 647 झाली आहे.
No comments:
Post a Comment