India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 16, 2020

India China Violent Face off Live | चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद



India China Violent Face off Live | चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद


भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. (India China Violent Face off Indian Army to hold press conference)

India China Violent Face off Live | चीनसोबतच्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद
India China Violent Face off 
नवी दिल्ली : भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चकमकीत चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाले आहे, एएनआयने याबाबतची माहिती दिली.
चीनी भागात हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली आहे. जखमी आणि मृत चीनी सैनिकांना नेण्यासाठी हेलिकॉप्टरची वर्दळ आहे. चीनी सैनिकांना नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
LIVE UPDATE : 
  • चीनी भागात हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली
  • भारत-चीन चकमकीत चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी
  • शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची शक्यता
  • भारत-चीन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद, एएनआयची माहिती
  • भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात सोमवारी रात्री हिंसक चकमक
भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, तिन्ही दलांचे प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली. राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. (India China Violent Face off Indian Army to hold press conference)
लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली.
1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिक शहीद झाल्याची घटना घडली आहे. 1975 मध्ये भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.


भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गलवान खोऱ्यात सैन्य माघारीदरम्यान अचानक संघर्ष उफाळला आणि रात्रीच्या वेळी चकमक झाली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही सैन्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यामध्ये चीनने केलेल्या गोळीबारात भारताचे एकूण तीन जवान शहीद झाले. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे”.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये हे प्रकरण शांत करण्यासाठी घटनास्थळावर बैठक होत आहे. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. यावरुनच चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनामुळे चीनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत आहे, असं संरक्षक तज्ज्ञांचं मत आहे.
दरम्यान, भारतीय सैनिकांनी सोमवारी बेकायदेशीरपणे दोनदा सीमा ओलांडून आणि चिनी सैनिकांवर चिथावणीखोर हल्ले करुन कराराचे उल्लंघन केले, यामुळे गंभीर चकमकी घडल्या, असा दावा चिनी अर्थमंत्र्यांनी केला आहे.

दोन्ही देशात शांततेवर सहमती

दोन्ही देश चर्चेद्वारे तणाव कमी करण्यावर सहमत, चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची ग्लोबल टाईम्सला प्रतिक्रिया, सीमेवर शांतता ठेवण्यावर सहमती, चीन सैन्याने सीमा रेषेचं उल्लंघन करु नये असे भारतास सांगितले, कुठलीही एकतर्फी कारवाई तणाव वाढवेल, असं चिनी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. (India China Violent Face off Indian Army to hold press conference)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages