Maharashtra Corona Update | .....
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 13 हजारांवर......
राज्यात आतापर्यंत 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे.
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 13 हजारांवर
राज्यात आतापर्यंत 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या (Total Corona Patients In Maharashtra) पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आज दिवसभरात तब्बल 2 हजार 701 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1 लाख 13 हजार 445 वर (Total Corona Patients In Maharashtra) पोहोचली आहे.
राज्यात आतापर्यंत 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील कोरोनाबळींची संख्या 5,537 वर
राज्यात आज दिवसभरात 81 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 5 हजार 537 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 802 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील 57 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत (Total Corona Patients In Maharashtra).
5,86,686 जण होम क्वारंटाईनमध्ये
राज्यातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचा दर आता 50.99 टक्क्यांवर आला आहे. तर राज्याचा मृत्यूदर सध्या 4.8 टक्के इतका आहे. राज्यात 5 लाख 86 हजार 686 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, सध्या 27 हजार 242 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
Total Corona Patients In Maharashtra
|
No comments:
Post a Comment