Sonu Sood: सोनू सूद शिवसेनेच्या रडारवर का आला?
अभिनेता सोनू सूद यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली असली तरी त्याच्यावर झालेल्या टीकेवरून कवित्व सुरूच आहे. (Why Shiv Sena attack Sonu Sood?)
sonu sood breaking news
sonu sood breaking news
गेले दोन महिने लॉकडाऊनमध्ये अडकललेल्या हजारो स्थलांतरितांना सोनू सोदू यानं एका संस्थेच्या मदतीनं त्यांच्या गावी पाठवलं. खासगी बसमधून मजुरांना निरोप देताना सोनू सूद अनेक टीव्ही वाहिन्यांवर दिसत होता. त्याचे फोटोही वर्तमानपत्रात छापून आले. त्यामुळं तो घराघरांत पोहोचला. मात्र, सोनूच्या कामामुळं सोशल मीडियावर लोक सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. तरीही कोणी त्याच्या कामाला आक्षेप घेतला नव्हता. पण काही दिवसांपूर्वी सोनू सूद यानं राज्यपालांची भेट घेऊन आपल्या कामाची माहिती दिली. तिथंच या सगळ्याला राजकीय स्वरूप आलं.
राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून राज्यपाल हे सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा सत्ताधारी महाविकास आघाडीचा आरोप आहे. खरंतर, राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सोनू सूद महाराष्ट्रातील श्रमिकांना मदत करू शक्य नव्हतं. मात्र, कामाची माहिती द्यायला तो राज्यपालांकडं गेला. राज्यपालांनीही त्याला मदतीचं आश्वासन दिल्याचं समोर आलं. राज्यातील अगदी सामान्य माणूसही राज्यपालांकडे जाऊ शकतो. त्याबद्दल कुणाचाही आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र, राज्यात लोकनियुक्त सरकार असताना व या सरकारमधील यंत्रणेकडूनच मदत होत असताना त्यांना डावलून सोनू सूदनं राज्यपालांना भेटणं शिवसेनेला खटकल्याचं बोललं जातं.
sonu sood breaking news
राज्यातील विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांकडं तक्रार करण्याऐवजी सतत राज्यपालांकडं जात असल्यानं शिवसेना आधीच संतापलेली होती. सोनू सूदच्या प्रकरणामुळं त्यात भर पडली आणि सोनूनं शिवसेनेची नाराजी ओढवून घेतली, असं सरकारमधील एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं.
वाचा: 'हा' आहे सोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता; संजय राऊतांनी उघड केले नाव
राऊतांचं 'ते' ट्विटही सूचक
sonu sood breaking news
No comments:
Post a Comment