India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2020

contry fight with corona | भल्याभल्यांना जमलं नाही ते 'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!

भल्याभल्यांना जमलं नाही ते 'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!

contry fight with corona | भल्याभल्यांना जमलं नाही ते 'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशाला जे जमलं नाही ते एका देशाने करून दाखवलं आहे. मागील १७ दिवसांमध्ये 

न्यूझीलंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे किवींनी करोनावर मात केली असल्याचे चित्र आहे.


 
या देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!
'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!

वेलिंग्टन: जगभरातील जवळपास २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेसारखा जागतिक महासत्ता असलेला देशही करोनासमोर हतबल झाला आहे. करोनाच्या संसर्गाला मात देणे जगातील मोठ्या देशांना जे जमले नाही ते न्यूझीलंडने करून दाखवले आहे. न्यूझीलंड करोनामुक्त झाला असून लॉकडाउनचे सर्वच निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत.

contry fight with corona | भल्याभल्यांना जमलं नाही ते 'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!
न्यूझीलंडमध्ये मागील १७ दिवसांमध्ये एकही नवीन करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. ऑकलंडमध्ये करोनाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णामध्ये मागील ४८ तासांत करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर, पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्रीपासून लग्न, अंत्यसंस्कार आणि सार्वजनिक वाहतूक कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरू करण्यात येणार आहे.

वाचा: करोनाचा संसर्ग: चीनने केला 'हा' मोठा खुलासा
contry fight with corona | भल्याभल्यांना जमलं नाही ते 'या' देशानं करून दाखवलं! करोनाला हरवलं!
आता, न्यूझीलंडमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर पुढील आठवड्यात देश करोनामुक्त झाला असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात १५०४ जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडने करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवल्याबद्दल पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

वाचा: करोनावर नियंत्रण: 'या' महिला नेतृत्वाने करून दाखवलं!
करोनाशी निगडीत करोनाबाधितांची प्रकृती उत्तम झाल्यानंतर न्यूझीलंडने एक अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या मदतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना रुग्णांशी संबंधित व इतर अपडेट्स समजणार आहेत. करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. अखेर कठोर निर्बंधानंतर करोनाच्या संसर्गाला रोखण्यास यश मिळाले. न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात इटली आणि स्पेनमध्ये वेगाने करोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्याचवेळी न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते. त्यानंतर १९ मार्च रोजी न्यूझीलंडबाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली.
 लॉकडाउनच्या नियमांचे नागरिकांनीही पालन केले. एका मंत्र्याने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.करोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने दमदार कामगिरी केली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये जर्मनी, न्यूझीलंड, फिनलंड आदीसारख्या देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये करोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनाही प्रभावी ठरल्या असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या महिला नेत्यांची जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages