India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 8, 2020

Maharashtra News Latest Maharashtra News Headlines .... pune woman duped of rs 49 lakh-in-matrimonial-site raud

मेट्रिमोनी साइटवरून महिलेला ४९ लाखांचा गंडा; 'ही' काळजी घ्या!

pune woman duped of rs 49 lakh-in-matrimonial-site raud

मेट्रिमोनी साइटवरून झालेली ओळख एका उच्चशिक्षित महिलेला महागात पडलं आहे. विवाह व भागीदारीत व्यवसाय करण्याच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेची ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

 
pune woman duped of rs 49 lakh-in-matrimonial-site raud
pune woman duped of rs 49 lakh-in-matrimonial-site raud

पुणे: मेट्रिमोनी साइटवरून ओळख झाल्यानंतर विवाह व भागीदारीत व्यवसाय करण्याच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेची ४९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत धानोरी येथील ४९ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार बँक खातेधारक आणि वापरकर्ते तसेच डेनिस जेम्स, रिचर्ड डिव्हिजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्च ते ऑगस्ट २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेला त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दिली होती. त्यानुसार तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करतात. त्या राहण्यास धानोरी परिसरात आहेत. त्यांनी मेट्रिमोनी साइटवर नोंदणी केली होती. या वेबसाइटवरून त्यांची आरोपीसह ओळख झाली. त्या वेळी तो व्यावसायिक असल्याचे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर सतत संपर्क साधून आरोपीने त्यांच्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर विवाहाचे आमिष दाखवले. तसेच, भागीदारीत व्यवसाय करू असे सांगून विश्वास संपादन केला आणि व्यवसायासाठी पैशांची मागणी केली. त्यानंतर आरोपीने महिलेला वेगवेगळी कारणे सांगून वेळोवेळी एकूण ४९ लाख १५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे देऊनही व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विवाहाबाबत आरोपी काहीही बोलत नसल्याने महिलेला संशय आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या तक्रारीची प्राथमिक चौकशी सायबर पोलिसांनी केली. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत.
नागपूर: ...म्हणून तुकाराम मुंढेंविरोधात पोलिसांत तक्रार

२८ बँक खात्यांमध्ये भरले पैसे

भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून आरोपीने महिलेकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार महिलेने आरोपीच्या मागणीनुसार वेळोवेळी त्याने सांगितलेल्या २८ खात्यांमध्ये पैसे ट्रान्स्फर केले. पोलिस तपासात ही सर्व खाती परदेशातील असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या खात्यांमधून पैसे परत मिळवून देण्यात व आरोपींना पकडण्यात खूपच अडचणी येणार आहेत, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली.

- मेट्रिमोनी साइटवरून ज्या व्यक्तीची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्या माहितीची खात्री करून घ्या

- अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करू नका

- व्यवसायाच्या संदर्भात पैशांची मागणी होत असेल तर प्रत्यक्ष भेटून व्यवहार करावेत

- फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा
pune woman duped of rs 49 lakh-in-matrimonial-site raud

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages