India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 23, 2020

निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद

निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद झाला आहे. Solapur Barshi jawan martyr
निधड्या छातीने लढला, अतिरेक्यांशी भिडला, सोलापूरचा जवान पुलवामात शहीद
सोलापूर : एकीकडे चीनसोबत तणाव सुरु असताना, इकडे पाक सीमेवरही दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरुच आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचा जवान शहीद झाला आहे. पुलवामाजवळ बंडजु या भागात भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत, बार्शी तालुक्यातील पानगावचे वीर सुनील काळे (Sunil Kale martyr) हे धारातीर्थी पडले. सुनील काळे हे केंद्रीय राखीव संरक्षण दलामध्ये कार्यरत होते. सुनील काळे यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच बार्शी शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. (Solapur Barshi jawan martyr)
भारतीय जवानांना जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजु या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती आज पहाटे मिळाली होती. यावेळी CRPFच्या एका तुकडीने बंडजु परिसराची पाहणी केली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या अतिरेक्यांना जवानांनी घेरल्यानंतर, अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये सुनील काळे हे शहीद झाले.
दुसरीकडे भारतीय जवानांनीही दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी जागच्या जागी ठार झाले. मात्र या चकमकीत महाराष्ट्राचा वीर शहीद झाल्याने राज्यावर शोककळा पसरली.
शहीद जवान सुनील काळे हे मूळ बार्शी तालुक्यातील पानगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने भारतीय सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारतीय जवान त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत आहेत. नुकतंच तीन दिवसापूर्वी भारतीय सीमसुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानचा ड्रोन पाडला. बीएसएफने कठुआ बॉर्डरवर पाकचा ड्रोन टिपून उद्ध्वस्त केला.
चीनसोबत संघर्ष
भारत आणि चीन यांच्यात LAC वर संघर्ष सुरु आहे. 15 जूनच्या रात्री झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यामुळे भारतात संतापाची लाट आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. “एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही. सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडेही फायटर प्लेन आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं.
(Solapur Barshi jawan martyr)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages