India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 23, 2020

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी (Anil Deshmukh on Farmer loan) दिली.

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख

शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी (Anil Deshmukh on Farmer loan) दिली.
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : अनिल देशमुख शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी (Anil Deshmukh on Farmer loan) दिली.
मुंबई : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. (Anil Deshmukh on Farmer loan)
शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहे.
तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी द्यावी. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विरोधी पक्षही आक्रमक
तर दुसरीकडे अहमदनगमध्ये शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असं सांगूनही प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली नाही, त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून खतं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरु. तसेच जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. (Anil Deshmukh on Farmer loan)

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages