India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 23, 2020

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनाची धडक, टेम्पो चालक-क्लिनरचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनाची धडक, टेम्पो चालक-क्लिनरचा जागीच मृत्यू

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत शिरगावजवळ टेम्पोचालक आणि क्लिनर यांचे मृतदेह सापडले. (Pune Mumbai Express Way Shirgaon Accident)

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनाची धडक, टेम्पो चालक-क्लिनरचा जागीच मृत्यू
पिंपरी चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत शिरगावजवळ दोघांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी टेम्पोचालक आणि क्लिनर यांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune Mumbai Express Way Shirgaon Accident)
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत शिरगावजवळ टेम्पोचालक आणि क्लिनर यांचे मृतदेह सापडले. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईच्या दिशेने हे दोघे पिकअप वाहन घेऊन चालले होते. तेव्हा शिरगाव हद्दीत त्यांची गाडी बंद पडली. त्यानंतर हे चालक आणि क्लिनर पुण्याच्या दिशेने पायी निघाले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

दोघे जण आपल्या वाहनापासून जेमतेम 600 ते 700 मीटर अंतरावर पोहचले असतील, त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने, ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या कडेला फेकले गेले. मृतदेहाची अवस्था पाहता हा अपघातच असल्याचे शिरगाव पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages