एक महिन्याचे बाळ करोनामुक्त; KEMमध्ये यशस्वी उपचार
मुंबई
केईएम रुग्णालयातील वैद्यकीय उपचारांमुळे एक महिन्यांचे बाळ करोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत अकरा लहान मुलांमध्ये करोना संसर्गाचे निदान केईएम रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये करण्यात आले असून त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले आहे. तीव्र लक्षणे नसतील तर देखरेखीसाठी काही मुलांना करोना केंद्रामध्ये पाठवले आहे.रूग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या या एक महिन्याच्या बाळालाही एक घरातल्या सदस्यांकडून संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या बाळामध्ये दिसलेली संसर्गाची लक्षणेही तीव्र नव्हती. आमच्या विभागातील डॉक्टर दाखल होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी प्रयत्नशील असतात. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे बाळ बरे होऊन घरी गेले आहे. ओपीडीमध्ये अशा दहा ते अकरा मुलांमध्ये संसर्गाचे निदान करण्यात आले होते. काहींना उपचार झाल्यानंतर विलगीकरण केंद्रामध्ये पाठवण्यात आले आहे.
केईएम रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मुकेश अग्रवाल यांनी, लहान मुलांमध्ये लक्षणे दिसली तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असा दिलासा दिला आहे. शाळा बंद आहेत तसेच लहान मुलांना मोकळ्या वातावरणामध्येही नेले जात नाही. त्यामुळे बाहेरून संसर्ग होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment