आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी करोनावर शोधले औषध!
सध्या करोना ही महामारी जगासमोर आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट म्हणून उभे राहिले आहे. करोनावर उपचार करण्यासाठी ना कुठले
औषध आहे ना कुठली लस. व्हारयसमध्ये वेगाने बदल होत असल्याने कुठल्याही पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या औषधांचा त्यावर
परिणाम होत नाहीए, असं ICAR च्या प्रवक्त्याने सांगितलं.
नवी दिल्लीः हिसारमध्ये असलेल्या आयसीएआरच्या (ICAR) केंद्रातील शास्त्रज्ञांनी करोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा केला आहे. या औषधाची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरली तर करोना रुग्णांच्या उपचारात मदत होणार आहे.
Indian Council of Agriculture research (ICAR)च्या प्रवक्त्याने सांगितलं.
करोना महामारीचा सुरुवातीपासूनच केंद्रातील शास्त्रज्ञांनी पारंपारिक पद्धतीने औषधांचे परीक्षण सुरू केले. ज्याचा उपयोग माणसावर आधी इतर आजारांवर करण्यात आला आणि ते औषध पूर्णपणे सुरक्षित मानलं गेलं. ही औषधं थेट व्हायरस हल्ला करण्याऐवजी ते रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवतात. यानुसार VTC-antiC1 या औषधाचा उपयोग कोंबडीच्या पिलांवर करोना व्हायरविरोधात करण्यात आला. या औषधाच्या उपयोगाने कोंबडीच्या पिलांना सुरक्षा मिळाले आणि त्यांचा विकासही सामान्यपणे होत आहे. एन.डी.वी आणि बफैलोपॉक्स या विषाणूंवरही या औषधाचे परीक्षण केले गेले. आणि त्याचे निष्कर्ष चांगले आहे. यामुळे VTC-antiC1 हे औषध करोनाविरोधात उपयोगी ठरू शकते. आता त्या दृष्टीने आणखी काही परीक्षण करण्यात येत आहेत, असं आयसीएआरकडून स्पष्ट करण्यात आलंय.
No comments:
Post a Comment