मृत्यूपूर्वी हत्तीण १४ दिवस होती उपाशी, शवविच्छेदनात सत्य उघड
फटाकेयुक्त अननस खाल्ल्याने केरळमधील एका गर्भवती हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हत्तीणीचा शवविच्छेदन अहवान आला असून त्या
त ही हत्तीण १४ दिवस उपाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या फुफ्फुसात पाणी शिरून तिचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
पलक्कड: केरळच्या पलक्कड येथे स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे झालेल्या हत्तीणीच्या मृत्यूबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी देशभरातील लोकांनी केवळ शोक व्यक्त केला नाही, तर आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी दबावही आणला. बर्याच जणांनी अशा क्रूर कृत्यासाठी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मानव विरुद्ध इतर प्राणी असे बनलेल्या या प्रकरणात आता आणखी एक नवीन भयानक गोष्ट समोर आली आहे.
या हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती अत्यंत वेदनादायक आहे. तोंडात स्फोट झाल्यामुळे आणि जबड्याला नुकसान झाल्यामुळे या हत्तीणीला अतिशय असह्य वेदना सहन कराव्या लागत होत्या. तसेच मृत्यूच्या १४ दिवस आधी तिने काहीही खाल्ले नव्हते. या काळात तिला काहीही खाणे, पिणे शक्य नव्हते. पाण्यात जाण्यापूर्वी भूक आणि तहान लागल्यामुळे तिने गावात अनेक फेऱ्या मारल्या. तोंडा फटाके फुटून दुखापत झाली असतानाही वेदना होत असतानाही तिने कोणालाही इजा केली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच जात असताना तिने कोणच्याही घराचे नुकसान केले नाही. तिच्यात किती चांगुलपणा होता हेच यातून दिसते आहे, असे अधिकारी म्हणाला.
हत्तीणीच्या शवविच्छेदन अहवालात ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. तिच्या मृत्यूचे मुख्य कारण देखील फुफ्फुसातील पाणी जाणे हे असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात श्वास घेतल्यामुळे फुफ्फुसात पाणी शिरल्याने हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. तसेच अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिचा जबडा तुटला होता आणि तिला काहीच खाता येत नव्हते.
हत्तीणीच्या मृत्यूवर राजकारण
त्याचबरोबर दुसरीकडे हत्तीणीच्या मृत्यूवर राजकारणही तापू लागले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, हथिनीचा मृत्यू पलक्कडमधील मन्नारकड येथे झाला. मात्र ही घटना मलप्पुरममध्ये घडली असा दावा केंद्रीय मंत्र्यांसह अनेक नेते करत आहेत. राज्याने कोविड-१९ बाबत केलेल्या कामाची देशभर प्रशंसा होत असल्यामुळे या प्रकरणावरून राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे भाजपावर आरोप
या हत्तीणीचा झालेला मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पोलिस आणि वनविभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत, असेही ते म्हणाले. त्याचवेळी काँग्रेसनेही या प्रकरणाला जातीय रंग देण्यावरून भाजपवर टीका केली आहे. भाजप नेते या प्रकरणात मुद्दाम चुकीची माहिती पसरवित आहेत. महत्त्वाचे म्हणजे साइलेंट व्हॅलीच्या जंगलात हत्तीणीला फटाकेयुक्त अननस खायला देण्यात आले. हे फटाके तिच्या तोंडात फुटले आणि एका आठवड्यानंतर २७ मे रोजी तिचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment