India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 1, 2020

करून दाखवा, रडून नको; शेलारांचा महाविकास आघाडीला टोला | Maharashtra News

करून दाखवा, रडून नको; शेलारांचा महाविकास आघाडीला टोला
संकटाच्या काळात केंद्र सरकार महाराष्ट्राला पुरेशी मदत करत नसल्याच्या महाविकास आघाडीच्या आरोपांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. (Ashish Shelar Criticized Maha Vikas Aghadi)
आशिष शेलार

आशिष शेलार
मुंबई: केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारला २ लाख कोटींची मदत केल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा एका सुरात फेटाळणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. 'करोना आल्यापासून याचे रडणे रोजच सुरू आहे. आता ही रडगाणी थांबवा आणि काम करून दाखवा,' असा टोला शेलारांनी सत्ताधाऱ्यांना हाणला आहे. (Ashish Shelar Criticized Maha Vikas Aghadi)


केंद्र सरकारनं महाराष्ट्राला वेगवेगळ्या बाबतीत कशी मदत केली, याचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद घेऊन मांडला होता. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी आकडेवारीसह फडणवीसांचे दावे फेटाळले. 'फडणवीस हे स्वत:च्या पक्षाला सर्वाधिक महत्त्व देतात. भाजप हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू असा प्रश्न पडल्याची घणाघाती टीकाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. आघाडीच्या या पत्रकार परिषदेवर शेलार यांनी एकामागोमाग एक ट्विट करून टीका केली आहे.


'विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राला काय मिळेल आणि कसे मिळेल हे सांगितले त्यावर पोटात एवढी कळ का यावी? एका माणसाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आघाडीची तीन माणसं धावली. घाबरताय कशाला? तुमचं अपयश, नाकर्तेपणा उघड होतो त्याला? एकास तीन हे तर भित्रे आणि रडव्यांचे लक्षण,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'आघाडीची तीन माणसं बोलली की रडली...? करोना आल्यापासून हे रडणे रोजच सुरू आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे... आधी विरोधी पक्षाच्या नावानं... आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करून दाखवा ना! तुम्ही मदत द्या. शेतकऱ्यांना पँकेज द्या. कोरोनापासून महाराष्ट्राला वाचवा! रडू नका, असं शेलार दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages