India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Friday, June 19, 2020

Virat kohli amitabh bachchan | Boycott Chinese Products | चिनी उत्पादनांची जाहिरात करु नका, CAIT चं सिनेमा आणि क्रीडा क्षेत्राला खुलं पत्र

Boycott Chinese Products | चिनी उत्पादनांची जाहिरात करु नका, CAIT चं सिनेमा आणि क्रीडा क्षेत्राला खुलं पत्र

चिनी उत्पादनांची जाहिरात करणं बंद करावी, असं आवाहन या पत्रात आमीर खान, दीपिका पादुकोण, विराट कोहली इत्यादींना करण्यात आली आहे.
Boycott Chinese products चिनी उत्पादनांची जाहिरात करु नका, CAIT चं सिनेमा आणि क्रीडा क्षेत्राला खुलं पत्र चिनी उत्पादनांची जाहिरात करणं बंद करावी, असं आवाहन या पत्रात आमीर खान, दीपिका पादुकोण, विराट कोहली इत्यादींना करण्यात आली आहे INDIA 24 HOURS NEWS

Boycott Chinese Products 

मुंबई : कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) आज सिनेमा (Boycott Chinese Products) आणि क्रीडा विश्वातील बड्या व्यक्तींना एक खुलं पत्र लिहिलं. चिनी उत्पादनांची जाहिरात करणं बंद करावी, असं आवाहन या पत्रात आमीर खान, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, विराट कोहली इत्यादींना (Boycott Chinese Products) करण्यात आलं आहे.
दुसरीकडे, CAIT ने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, महेंद्र सिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि इतरांना “भारतीय सन्मान – आमचा अभिमान” अंतर्गत चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.
CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सिनेमा आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक बड्या लोकांसाठी हे खुलं पत्र जारी केलं. “चिनी सेनेने अत्यंत नीचपणे लडाख सीमेवर भारतीय सेनेवर हल्ला केला. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनात रोष आहे. त्यांना चीनला धडा शिकवायचा आहे”, असं या पत्रात म्हटलं आहे (Boycott Chinese Products).
CAIT ने डिसेंबर 2021 पर्यंत चीनकडील 13 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख कोटीची आयात कमी करण्याचा संकल्प केला आहे. सध्या चीनमध्ये बनलेल्या वस्तूंची भारतातील वार्षिक आयात जवळपास 70 बिलियन डॉलर म्हणजेच 5.25 लाख कोटी रुपये इतकी आहे.
CAIT ने आपल्या पत्रात म्हटलं, उपलब्ध माहितीनुसार, आमीर खान, सारा अली खान, विराट कोहली ब्रॅण्ड विवो, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, बादशाह ब्रॅण्ड ओप्पो, सिद्धार्थ मल्होत्रा, रणबीर कपूर, ब्रॅण्ड शाओमी, रणवीर सिंह, सलमान खान, आयुष्मान खुराणा आणि श्रद्धा कपूर ब्रॅण्ड रिअलमीसाठी जाहिरात करतात.
CAIT ने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, महेंद्र सिंग धोनी, सचिन तेंडुलकर, सोनू सूद आणि इतरांना देशाच्या हितासाठी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा आणि स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन (Boycott Chinese Products) केलं आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages