Madhav Patankar Dies | रश्मी ठाकरे यांना पितृशोक, माधव पाटणकर यांचे निधन
मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती (Rashmi Thackeray Father Madhav Patankar Dies)
Rashmi Thackeray Father Madhav Patankar Dies) |
मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे मुंबईत निधन झाले. (Rashmi Thackeray Father Madhav Patankar Dies)
वयाच्या 78 व्या वर्षी माधव पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज (सोमवार 15 जून) त्यांचे निधन झाले.
रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली. @OfficeofUT
122 people are talking about this
रश्मी ठाकरे यांच्याकडे ‘सामना’ आणि ‘मार्मिक’च्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Rashmi Thackeray Father Madhav Patankar Dies)
No comments:
Post a Comment