India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Monday, June 15, 2020

Indian embassy Officials in Pakistan missing | आधी राजदुताला धमकी, आता पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील दोन अधिकारी बेपत्ता

आधी राजदुताला धमकी, आता पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील दोन अधिकारी बेपत्ता

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील 2 भारतीय अधिकारी बेपत्ता झाले आहेत (Indian embassy Officials in Pakistan missing).
आधी राजदुताला धमकी, आता पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासातील दोन अधिकारी बेपत्ता पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील 2 भारतीय अधिकारी बेपत्ता झाले आहेत (Indian embassy Officials in Pakistan missing).
Indian embassy Officials in Pakistan missing
इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दुतावासातील 2 भारतीय अधिकारी बेपत्ता झाले आहेत (Indian embassy Officials in Pakistan missing). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील भारतीय दुतावासातील हे अधिकारी मागील दोन ते अडीच तासापासून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. यानंतर पाकिस्तान सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सीआयएसएफचे दोन ड्रायव्हर ड्यूटीवर बाहेर जात होते. मात्र, ते आपल्या ठिकाणावर पोहचण्याआधीच बेपत्ता झाले. त्यांच्या अपहरणाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर चालकांचा तपास सुरु आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या बेपत्ता झाल्याची माहिती पाकिस्तान सरकारला देखील देण्यात आली आहे.
भारतीय राजदुतांना धमकावण्याचा प्रयत्न
विशेष म्हणजे याआधी भारतीय राजदुतांना धमकावण्याचा प्रयत्न झाला होता. आयएसआयच्या एजंटने भारतीय राजदुताचा पाठलाग करत त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारताने आधीच आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता दोन चालक बेपत्ता झाल्याने या तणावात आणखीच भर पडणार आहे.
इस्लामाबादमध्ये रुजू असलेले भारतीय राजदुत गौरव अहलूवालिया यांना पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयने त्रास दिल्याचंही प्रकरण समोर आलं आहे. गौरव अहलूवालिया यांना घाबरवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले गेले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी एका बाईकने त्यांचा पाठलाग केल्याचाही प्रकार समोर आला होता.
याआधी भारतीय सुरक्षा दलाने दिल्लीतील पाकिस्तानी दुतावासातील 2 व्हिजा सहाय्यकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर भारतीय सुरक्षेसंबंधित तयारीच्या माहितीची हेरगिरी केल्याचा आरोप होता. यानंतर भारताने पाकिस्तानच्या या दोन अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा घोषित करत तात्काळ पाकिस्तानमध्ये पाठवलं होतं.
हेही वाचा : 
दाऊद इब्राहिमला ‘कोरोना’, कराचीत लष्करी रुग्णालयात उपचार
भारताला अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला कोरोना
पाकिस्तानच्या जीडीपी इतकं आमचं केवळ आर्थिक पॅकेज, मदतीची ऑफर देणाऱ्या इम्रान खान यांना भारताच्या कानपिचक्या
Indian embassy Officials in Pakistan missing

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages