India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 3, 2020

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोळ्या घालू, सोशल मीडियावरून धमकी /Latest News

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना गोळ्या घालू, सोशल मीडियावरून धमकी


सोशल मीडियावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना लक्ष्य करण्यात येत असून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. कोल्हे यांना शिर्डी येथे आल्यावर गोळ्या घालू,' अशी धमकी देण्यात आली आहे.

 
खासदार डॉ. अमोल कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे
जुन्नर: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर वादंगाचे पडसाद अजूनही थांबण्याचे नाव नाही. सोशल मीडियावरून खासदार डॉ. अमोल कोल्हे  यांना लक्ष्य करण्यात येत असून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिर्डी येथील तीन जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समाजमाध्यमावरील 'देशमुख फ्रेंड सर्कल महाराष्ट्र राज्य' या ग्रुपवर शिर्डीतील तिघांनी अश्लाघ्य 'कमेंट' केल्या आहेत. 'खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची पाठराखण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. डॉ. कोल्हे यांना शिर्डी येथे आल्यावर गोळ्या घालू,' अशी धमकी देण्यात आली आहे. यावरून नारायणगाव पोलिसांनी शिर्डी येथील तिघांवर शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. या प्रकरणी डॉ. कोल्हे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. यासह नारायणगाव येथील सागर शशिकांत भुजबळ (वय ४०) यांनीही तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण?

सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा आरोप चार दिवसांपूर्वी अक्षय बोऱ्हाडे याने फेसबुक लाइव्हद्वारे केला होता. हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरातून विविध संस्था, संघटना, पदाधिकारी यांनी अक्षयला पाठिंबा देऊन शेरकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यातच या प्रकरणात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांनाही समाजमाध्यमावर ट्रोल व्हावे लागले होते. शिवसेना, भाजपनेही या वादात उडी घेऊन अक्षयला पाठिंबा दिला. या प्रकरणाला राजकीय रंग येत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बोऱ्हाडे-शेरकर यांच्यातील वाद थांबविण्याबाबत आमदार अतुल बेनके यांना सूचना केल्याची चर्चा होती. यानंतर बेनके यांनी शिरोली येथे जाऊन बोऱ्हाडे आणि शेरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. शेरकर आणि बोऱ्हाडे यांनी शिरोली ग्रामपंचायतीमध्ये एकत्र येऊन दोघांत समेट झाल्याचे सर्वांसमोर जाहीर केले.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages