'त्या' हत्तीणीच्या क्रूर मारेकऱ्यांना सोडणार नाही; केंद्र सरकारनेही घेतली गंभीर दखल
केरळमधील मलप्पुरम येथे फटाके चारल्यानंतर एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गभीर दखल घेत दोषींना कडक शिक्षा
करण्यात येईल असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. यापूर्वी केरळ सरकारनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मनेका गांधींची राहुल गांधींवर टीका
देशातील विविध स्तरावर या अमानुष कृत्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेला राजकीय रंगही देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणाबाबत नेहमीच अग्रेसर आणि आग्रही भूमिका घेणाऱ्या मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे ज्या भागात हे कृत्य घडले त्याच भागातील राहुल गांधी हे खासदार आहेत. मग राहुल गांधी यांनी कारवाईचे प्रयत्न का केले नाहीत, ते गप्प का आहेत, असे सवाल मनेका गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
भुकेल्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खाऊ घालण्यात आले. ते अननस खात असतानाच तिच्या तोंडातच फटाक्यांचा स्फोट झाला आणि तिचे तोंड फुटले. हत्तीणीच्या तोडाला प्रचंड जखमा झाल्या. या अवस्थेत ती जंगलाकडे पळत निघाली. अखेर त्रास सहन होत नाही असे पाहून हत्तीणीने वेलियार नदीत जाऊन पाण्यात तोंड बुडवून त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. वन विभागाचे कर्मचारी तिच्या मदतीसाठी धावले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अखेर हत्तीणीने पाण्यातच प्राण सोडले. त्यानंतर या हत्तीणीवर वन विभागाने अंत्यसंस्कार केले.
No comments:
Post a Comment