India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत |world news

                                     
'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत |world news

            'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत |world news      

करोनाचा संसर्ग रोखण्यात राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने घरच्या आंगणात उभे राहून सरकारविरोधात फलक दाखविले

  
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनाचा संसर्ग रोखण्यात राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने घरच्या आंगणात उभे राहून सरकारविरोधात फलक दाखविले. भाजपच्या या आंदोलनातील एक फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला असून, यामध्ये काळ्या रंगाच्या कपड्याने तोंड झाकलेली एक महिला मुस्लिम महिलांप्रमाणे बुरख्यामध्ये दिसत आहे. परंतु, महिलेने कपाळावर टिकली लावली असल्याने भाजपमध्येही या फोटोबद्दल कुजबुज सुरू आहे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा फोटो शेयर केला गेला आहे. परंतु, तो मुस्लिम युवतीचा आहे, असे कुठेही म्हटलेले नाही, अशी सारवासारव याबाबत भाजपकडून केली जात आहे. राज्यातील सरकार हे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेले आहे, दोन महिने सर्व उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी प्रदेश भाजपने 'मेरा आंगण,मेरा रणांगण',असे आंदोलन केले.यात अडीच लाख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचा दावा भाजपने केला. या आंदोलनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर झळकले. सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाईच यातून सुरू झाली.

'बनावट फोटोची गरज नव्हती'

यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक वरील एका महिलेच्या फोटोने वादाला तोंड फुटले. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी, मुस्लिम वेषातील महिलेचा फोटो आहे, परंतु टिकली राहिलेली आहे, असे म्हणत भाजपला लक्ष्य केले. आंदोलनातील या वादग्रस्त फोटोबद्दल भाजपमध्ये उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाहीत. फडणवीस यांच्याच फेसबुकवर हा फोटो असल्यामुळे तो नाकारता येत नाहीआणि बुरख्यातील महिलेच्या कपाळावरील टिकलीबाबत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोशल मीडियावरून टीका करत असल्याने त्याला धड उत्तरही देता येत नाही, अशी भाजप नेत्यांची अवस्था आहे. असे बनावट फोटो टाकायची गरज नव्हती, असे काही नेते खासगीत कुजबूज करत असले, तरी उघडपणे याबाबत बोलण्यापेक्षा मिठाचीच गुळणी धरणेच सध्याच्या राजकारणात योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

       

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages