India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

'करोना रुग्णांना ‘क्लोरोक्विन’चे ठोस फायदे नाहीत!'||world news


 'करोना रुग्णांना ‘क्लोरोक्विन’चे ठोस फायदे नाहीत!'||world news

 'करोना रुग्णांना ‘क्लोरोक्विन’चे ठोस फायदे नाहीत!'||world news

करोना संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या क्लोरोक्विन तसेच हायड्रोक्सिक्लोरोक्विन या औषधांचे ठोस फायदे दिसत नसल्याचे लॅन्सेटच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोना संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या क्लोरोक्विन तसेच हायड्रोक्सिक्लोरोक्विन या औषधांचे ठोस फायदे दिसत नसल्याचे लॅन्सेटच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. या औषधांच्या परिणामांचा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करण्याची गरजही या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली.
ही दोन्ही औषधे प्रतिजैविकांसह किंवा त्यांच्याशिवाय घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना वैद्यकीय फायदा होत नसल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामध्ये करोनाचा संसर्ग झालेल्या १५ हजार रुग्णांमधील या औषधांच्या उपयुक्ततेसंदर्भात अभ्यास करण्यात आला. काही रुग्णांमध्ये अन्य औषधांसह देण्यात आलेल्या या गोळ्यांचा प्रभाव तपासून पाहण्यात आला आहे. मॅक्रोलाइट प्रतिजैविकांसह काही रुग्णांना हे औषध देण्यात आले होते, तर काहींना फक्त गोळ्या देण्यात आल्या होत्या, त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता या अभ्यासात वर्तवण्यात आली आहे. क्लोरोक्विन हे मलेरियाप्रतिरोधक औषध आहे, तर हायड्रोक्सिक्लोरोक्विन हे ऑटोइम्युन प्रकारच्या व्याधीमध्ये वापरण्यात येते. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच ही दोन्ही औषधे या आजारांमध्ये घ्यायची असतात व निर्देश दिल्यानंतर थांबवणेही अपेक्षित आहे.

वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशांमध्ये असलेल्या रुग्णांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. ब्रिगहॅम आणि वुमेन हॉस्पिटल सेंटर फॉर अॅडव्हान्स हार्ट डिसिज इन बोस्टनमधील कार्यकारी संचालकांनी अशा प्रकारचा हा पहिला मोठा अभ्यास असल्याचे सांगितले. हे औषध निश्चित वैद्यकीय चाचण्यांशिवाय करोनाच्या उपचारपद्धतीत वापरू नये, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages