India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

पुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले |pune news,covid 19

पुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले |pune news,covid 19

पुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले |pune news,covid 19

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २५८ जणांना करोनाची लागण झाली आहे. पुण्यासह पिंपरी- चिंचवडमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय १७६ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

पुणे: पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २५८ जणांना करोनाची लागण झाली आहे. पुण्यासह पिंपरी- चिंचवडमध्येही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला. त्याशिवाय १७६ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यात गेल्या २४ तासांत ६८१ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. गंभीर रुग्णांची संख्या आज १७६ झाली असून, १२९ रुग्ण अतिगंभीर आहेत. ७७ रुग्ण नव्याने बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २,५५०पर्यंत पोहोचली आहे. पुण्यात रविवारी १८६ जणांना लागण झाली असून, पिंपरी-चिंचवडमध्ये ४६ जणांना लागण झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १८ आणि पुणे कँटोन्मेंट भागात ८ रुग्ण आढळले. पुणे शहर आणि जिल्ह्यात नव्याने २५८ जणांना लागण झाली असून, त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ५,६९४ पर्यंत पोहोचली आहे.

चाचण्यांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रयोगशाळांवर ताण येत आहे. त्यामुळे स्वॅबचे अहवाल येण्यास विलंब होत आहेत. परिणामी, मृतांचे स्वॅब आल्याशिवाय त्यांचा मृत्यू करोनाच्या संसर्गाने झाला की नाही, याचे निदान होत नाही. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी संबंधित मृताची नोंद केली जाते. ससून रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या आणि त्याच दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल शनिवारी उशिरा प्राप्त झाला. त्यात त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळले.
गुलटेकडी येथील २१ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. अन्य मृतांमध्ये भवानी पेठ, गणेश पेठ, सॅलिसबरी पार्क, गणेशनगर (येरवडा), नाना पेठ आदी भागांतील व्यक्तींचा समावेश आहे. मृतांमध्ये २१ वर्षांचा तरुण वगळता पन्नाशीच्या पुढील ज्येष्ठांचा समावेश आहे. नाना पेठेतील ६७ वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती सोलापूर येथील असल्याची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची संख्या २७६पर्यंत पोहोचली.
पुण्यातील आजची स्थिती

बरे होऊन घरी गेलेले पॉझिटिव्ह रुग्ण ९२

ससून रुग्णालयातील रुग्ण ७

नायडू रुग्णालयातील रुग्ण १२७

खासगी रुग्णालयातील रुग्ण ४५

गंभीर १७६

रविवारचे मृत्यू ७

एकूण पॉझिटिव्ह ५,६९४ (शहर ४,८५९, पिंपरी-चिंचवड ३४५, पुणे ग्रामीण १७२, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय ३१८ )

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages