India 24Hours news

India News: Get latest news & live updates from India, live India news headlines, breaking news India. Read all latest India news & top news on India Today.

Breaking

Post Top Ad

Sunday, May 24, 2020

चंद्र दर्शन झाले; मुस्लिम बांधव उद्या घरीच ईद-उल-फित्र साजरी करणार |world news

चंद्र दर्शन झाले; मुस्लिम बांधव उद्या घरीच ईद-उल-फित्र साजरी करणार |world news

चंद्र दर्शन झाले; मुस्लिम बांधव उद्या घरीच ईद-उल-फित्र साजरी करणार |world news


आज चंद्र दर्शन झाल्याने उद्या सोमवारी संपूर्ण देशभरात ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्यात येणार आहे. रमजानचे तीस रोजे पूर्ण झाले असून उद्या मुस्लिम बांधव उत्साहात ईद साजरी करणार आहेत. मात्र, देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुस्लिम बांधव घरातच राहून ईद साजरी करणार आहेत. घरातच नमाज पठण करण्यात येणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात येणार आहे.
मुंबई: आज चंद्र दर्शन झाल्याने उद्या सोमवारी संपूर्ण देशभरात ईद-उल-फित्रचा सण साजरा करण्यात येणार आहे. रमजानचे तीस रोजे पूर्ण झाले असून उद्या मुस्लिम बांधव उत्साहात ईद साजरी करणार आहेत. मात्र, देशात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने मुस्लिम बांधव घरातच राहून ईद साजरी करणार आहेत. घरातच नमाज पठण करण्यात येणार असून यावेळी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात येणार आहे

करोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपालन करण्यास सांगण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच ईदचा सण घरीच साजरा करण्यात येणार आहे. रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर ईद साजरी केली जाते. २९ किंवा ३० दिवसांचे रोजे पूर्ण झाल्यावर चंद्र दर्शन झाल्यावरच ईद साजरी केली जाते. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीसह सर्व आखाती देशात ३० रोजे पूर्ण झाल्यावर चंद्र पाहून २४ मे रोजी ईद साजरी करण्यात आली. भारतात आज चंद्र दर्शन झाल्याने उद्या २५ मे रोजी ईद साजरी करण्यात येणार आहे.

ईद-उल-फितरः बंधुत्वाचा संदेश देणारी रमजान ईद

दरम्यान, मुस्लिम धर्मगुरू आणि मौलवींनी घरीच राहून ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. ईदच्या दिवशी हस्तांदोलन किंवा गळाभेट न करता सोशल डिस्टन्सिंगंच पालन करा आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा द्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनेच ईद साजरी करा, असं आवाहनही मुस्लिम धर्म गुरूंनी केलं आहे.

ईद-उल-फितरः चंद्रदर्शनानंतर साजरी होणार रमजान ईद

राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील सर्व नागारिकांना, विशेषतः मुस्लीम बंधू-भगिनींना ईद-उल-फित्रनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्व दिले आहे. यंदा करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत परोपकाराचे महत्व अधोरेखित झाले आहे. यावर्षी ईद घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन करतो. ही ईद सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.


घरीच नमाज अदा करा: पवार

ईद-उल-फितर तथा 'रमजान ईद' आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करणारा पवित्र सण आहे. आज आपले 'करोना' विरुद्ध लढा सुरु आहे, तो आपण अजून जिंकला नसला तरी निर्णायक टप्प्यावर आहे. 'कोरोना'ला हरविण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज घरीच अदा करावी आणि गळाभेटीऐवजी फोनवरुन नातेवाईक आणि मित्रमंडळींना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'रमजान ईद'च्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा: थोरात

इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान कोरोना संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लीम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदला सुद्धा घराबाहेर न पडता घरात थांबूनच ईद-उल-फित्र साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


ईद घरीच साजरी करा: शेख

राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देताना रमजान ईदचा आनंद घरी राहुनच साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. जग व देश कोरोना नावाच्या महाभयंकर संकटातून जात असताना परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मुस्लिम बांधवांनी संयम पाळून आपले आतापर्यंत सगळे धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडले. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. याही पुढे अशाच प्रकारच्या संयमाची अपेक्षा आहे, असं शेख म्हणाले

No comments:

Post a Comment

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Post Top Ad

Your Ad Spot

Pages